सामाजिक

न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालयाची इमारत ही श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी – आशिष फडणवीस

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालयाची इमारत ही श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी असल्याचे मनोगत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे बंधू व नागपूर येथील उद्योजक आशिष फडणवीस यांनी व्यक्त केले.
ते सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालय इमारत बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले, पुणे हे उपस्थित होते.
याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, एस.के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने,श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, , धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, शुभम सावंत, विनायक भोसले, समर्थ शिंदे, किरण साठे, महांतेश स्वामी, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button