देशात इंटरनेट वापरात महिला अव्वल

तब्बल ९४ % टक्के महिलांनी वापरले इंटरनेट
नवी दिल्ली – डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात गोव्यातील महिलांनी देशात आघाडी घेतली आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार गोव्यातील १५ ते ४९ वर्षे वयोगटातील तब्बल ९४ % टक्के महिलांनी इंटरनेटचा वापर केला आहे.इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ
या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या*
आणि सहाव्या फेरीतील आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास संशोधकांनी केला आहे.देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनात्मक अभ्यासात गोवा पहिल्या क्रमांकावर असून सिक्कीम ९०.३ % टक्क्यांसह दुसऱ्या, तर केरळ ८७.३ % टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे देशातील महिलांच्या इंटरनेट वापराचे लोकसंख्येनुसार सरासरी प्रमाण ६४.४ % टक्के असताना गोव्याचे प्रमाण त्यापेक्षा तब्बल २९.६ % टक्क्यांनी अधिक आहे.इंटरनेटचा वापर या संज्ञेचा अर्थ संबंधित महिलेने आयुष्यात किमान एकदा इंटरनेट वापरले आहे
असा आहे.याचा अर्थ ९४ % टक्के महिला दररोज इंटरनेट वापरतात किंवा त्यांच्याकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे असा होत नाही.देशातील ३५ राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वतः वापरत असलेला मोबाइल फोन असणाऱ्या महिलांचे सरासरी प्रमाण ६४.९ % टक्क्यांवरून ७३.४ % टक्क्यांपर्यंत वाढले आहे.म्हणजेच केवळ ८.५ % टक्के वाढ झाली.महिलांच्या इंटरनेट वापरात गोव्याने ९४ % टक्क्यांसह मिळवलेले अग्रस्थान हे डिजिटल सहभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.२०१९ ते २०२१ या कालावधीत झालेल्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात गोव्यातील ७३.७ % टक्के महिलांनी कधी ना कधी इंटरनेटचा वापर केल्याचे नोंदवले होते.२०२३-२४ मध्ये सहाव्या सर्वेक्षणात हे प्रमाण ९४ % टक्क्यांवर गेले.म्हणजे दोन सर्वेक्षणांदरम्यान २०.३% टक्के वाढ झाली.पाचव्या सर्वेक्षणातही गोवा आघाडीच्या राज्यांमध्ये होता.त्यावेळी सिक्कीममध्ये ७६.७ % टक्के ,चंडीगडमध्ये ७५.२ % टक्के ,
तर गोव्यात ७३.७ % टक्के महिलांनी इंटरनेटचा वापर केला होता.मात्र, सहाव्या सर्वेक्षणात गोव्याने दोघांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.महाराष्ट्र, कर्नाटकला टाकले मागे या आकडेवारीवरून गोव्याने इंटरनेट वापराच्या बाबतीत महाराष्ट्र आणि कर्नाटकलाही मोठ्या फरकाने मागे टाकल्याचे स्पष्ट होते.गोव्यातील महिलांचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा ३१.४ % टक्क्यांनी तर कर्नाटकपेक्षा ३६.१ % टक्क्यांनी अधिक आहे.



