Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

Admin by Admin
February 22, 2026
in महाराष्ट्र
0
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा आरएसएस वर घणाघाती हल्ला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.

काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत विविध सामाजिक संघटनांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये एपस्टीन या फाईलमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने एक ईमेल असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच अमेरिका-भारत व्यापारी करारामुळे भारत अमेरिकेचा गुलाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या जुन्या वादांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली.

‘एपस्टीन फाईल’ आणि गंभीर आरोप :

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एपस्टीन फाईलमध्ये जेफ्री एपस्टीनने मोदींना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी इस्रायल दौऱ्यात ‘नाच-गाणे’ करण्याचा सल्ला दिला होता. त्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी नाचगाणे केल्याचा उल्लेख इमेल मध्ये आलाय. यावरून त्यांनी पंतप्रधानांवर टीका करत, केंद्र सरकारने देशाला गहाण ठेवल्याचा आरोप केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेसोबत झालेला करार केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित नसून, भारताची विदेश नीती, अर्थ नीती आणि आरोग्य नीती आता अमेरिका ठरवणार आहे. पंतप्रधानांनी देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधले आहे, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. हा देश विकण्यापासून वाचवण्यासाठी २ मार्च रोजी होणाऱ्या निदर्शनांत तमाम जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दरम्यान, एपस्टीन फाइलमध्ये नरेंद्र मोदीचे नाव आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

 

Previous Post

निवडणूक आयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना मागितला नागरिकत्वाचा पुरावा!

Next Post

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Admin

Admin

Next Post
बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157238
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697