सामाजिक

अक्कलकोट येथे मातंग समाजाकडून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथे मातंग समाजाकडून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा , पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे , माजी नगराध्यक्ष अश्फाक बळोरगी , अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले ,माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे , यशवंत धोंगडे , बाबासाहेब पाटील ,काँग्रेस पक्ष युवक आघाडी तालुकाध्यक्ष निशांत कवडे , सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिमेचे पूजन अमोलराजे भोसले , पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुवर्ण मलगोंडा अशपाक बळोरगी , महेश हिंदोळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक बागाव आदींनी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे व जयंती समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास सुनील खवळे , अनिल गवळी , शंकर हातागळे , अभिमान वाघमारे , बेळळे ,विशाल ठोंबरे , भारत देडे ,देविदास खवळे ,समर्थ कांबळे, अविनाश पारखे , गणेश खवळे , शेखर देडे ,आनंद गवळी, तानाजी खवळे , अनिल शितोळे ,अमर  देडे ,रमेश पारखे , सुरेश दसाडे ,स्वामी शितोळे , नेताजी खवळे , आदिनाथ कांबळे ,मल्हारी पारधे , गणेश खवळे ,समर्थ देवकुळे , रामा बाळशंकर ,आकाश हातागळे , राजू देडे , अंबादास शितोळे , संतोष खवळे , दत्ता केंदळे , परशु देडे ,गोपाळ खवळे , नितीन पवळे, आकाश कांबळे , रोहित देवकुळे ,बापू शिरसाठ , रणबा देडे आदींसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार जयंती समिती अध्यक्ष श्रीपाद खवळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button