महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्या निधनावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितली जुनी आठवण; म्हणाले, ‘हिंदी सिनेमातील पहिले मराठी नायक’

 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया x अकाउंटवर नाना पाटेकर यांच्या अभिनय कारकिर्दीतील योगदानाचा उल्लेख केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “नाना पाटेकर म्हणजे हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने मोठी छाप सोडणारे व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्रातील एक नावाजलेले नट, ज्यांनी हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदी सिनेमात मराठी नायक हा नाना पाटेकर येईपर्यंत कोणीच नव्हता. नाना पाटेकर हे हिंदी सिनेमातील पहिले मराठी नायक ठरले.”

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली, “पुण्यातील एक प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक रमाकांत कवठेकर यांनी पुण्यातील एका घटनेवर एक सिनेमा करायचा ठरवला होता. ते नाना पाटेकर यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. तेव्हा माझी आणि नाना पाटेकर यांची ओळख झाली होती,” अशी आठवण ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली.

पुढे ते म्हणाले, “नाना पाटेकर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आपला स्वतःचा ठसा चित्रपटामध्ये आणि भूमिकेमध्ये उमटवला. हिंदी सिनेमात त्यांनी कधीच दुय्यम भूमिका स्वीकारली नाही. कायम त्यांनी नायकाची भूमिका बजावली. ती इमेज लोकांच्या मनात कायम कोरलेली राहील,” असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, गुरुवार (८ ऑक्टोबर) रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्यावर डोणजे या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button