देश - विदेश

दिल्लीतील सुप्रीम कोर्टावर निघालेल्या मोर्चात खासदार प्रणिती शिंदे सहभागी

 

नवी दिल्ली – ‘वोट चोरी’ बंद करा, एसआयआर (SIR) प्रक्रिया थांबवा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या. या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार, ज्येष्ठ नेते आणि देशभरातील लाखो नागरिकांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने या आंदोलनात सहभाग नोंदवला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी एकजूट दाखवली. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार अबाधित राखण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “आज हिंदुस्थानातील जनता रस्त्यावर उतरली आहे आणि गद्दारांना ठामपणे आपला इशारा दिला आहे. लोकशाही आमची आहे आणि तिच्या रक्षणासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू; लोकशाहीला कोणताही धक्का लागू देणार नाही. ‘मतचोरांना’ आम्ही माफ करणार नाही. त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी कायदेशीर लढा लढू. ‘मतचोरांना’ सत्तेतून जावेच लागेल.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराच्या मताचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी काँग्रेस व इंडिया आघाडीचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button