महाराष्ट्र

७२ च्या दुष्काळाची आठवण… आणि आज पुन्हा तेच दिवस येणार का..

 

शेताकड पाहिल की यावर्षी उन्हाची तीव्रता काही वेगळीच जाणवतेय. आभाळाकडे पाहिल तरी पावसाची चिन्ह नाहीत आणि काळ्या मातीवरची भेग दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. हे सगळ पाहिल की गावातली जुनी माणस सांगायची तो १९७२ चा दुष्काळ आठवतो. आजची परिस्थिती तशीच आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण उन्हाची झळ आणि पाण्याची चिंता पाहता मनात एकच विचार येतोय कुठ पुन्हा तशा दिवसांची सुरुवात तर होत नाही ना?

जुनी माणस सांगतात, ७२ च्या दुष्काळात फक्त पाणीच नव्हत अस नाही, तर अनेक ठिकाणी माणसांच्या अन्नाचीही पंचाईत झाली होती. शेतात पीक नव्हतं, घरात धान्य नव्हतं आणि जनावरांना चारा मिळणं तर आणखी कठीण झालं होतं. मग जगण्यासाठी माणसाने निसर्गात जे काही उरलं होतं त्याचाच आधार घेतला.

शेतात कुंदा, हराळ अशी रानटी मुळ खणून काढायची. त्याची मुळ जनावरांना खाऊ घालायची. जनावरं कसंबसं जगायची आणि त्यांच्या दुधावर घर चालायचं. आजच्या पिढीला ही गोष्ट ऐकली तर कदाचित विश्वास बसणार नाही; पण त्या पिढीने तो काळ आपल्या डोळ्यांनी पाहिलाय, सोसलाय आणि पार केलाय.

त्या वेळच्या माणसाकडे साधन कमी होती, पण निसर्गाची ओळख मोठी होती. कोणती वनस्पती जनावराला चालते, कोणती मुळं उपयोगी पडतात, कोणत्या परिस्थितीत काय करायचं, हे त्यांना अनुभवातून माहीत होतं. म्हणूनच संकट कितीही मोठं असलं तरी त्यांनी संसार आणि जनावरं जगवली.

आज आपल्याकडे सुविधा आहेत, बाजार आहे, वाहतूक आहे, धान्याची साठवणूक आहे. पण तरीही शेतीवरचं संकट कमी झालेलं नाही. उलट शेतीचा खर्च वाढला, पाण्याची गरज वाढली आणि हवामानाचा अंदाज अधिकच अनिश्चित झाला.

म्हणूनच कदाचित पुन्हा ७२ च्या दुष्काळाची आठवण… आणि आज पुन्हा तेच दिवस येणार का?

शेताकडं पाहिलं की यावर्षी उन्हाची तीव्रता काही वेगळीच जाणवतेय. आभाळाकडे पाहिलं तरी पावसाची चिन्हं नाहीत आणि काळ्या मातीवरची भेग दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. हे सगळं पाहिलं की गावातली जुनी माणसं सांगायची तो १९७२ चा दुष्काळ आठवतो. आजची परिस्थिती तशीच आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण उन्हाची झळ आणि पाण्याची चिंता पाहता मनात एकच विचार येतोय कुठ पुन्हा तशा दिवसांची सुरुवात तर होत नाही ना?

जुनी माणसं सांगतात, ७२ च्या दुष्काळात फक्त पाणीच नव्हतं असं नाही, तर अनेक ठिकाणी माणसांच्या अन्नाचीही पंचाईत झाली होती. शेतात पीक नव्हतं, घरात धान्य नव्हतं आणि जनावरांना चारा मिळणं तर आणखी कठीण झालं होतं. मग जगण्यासाठी माणसाने निसर्गात जे काही उरलं होतं त्याचाच आधार घेतला.

शेतात कुंदा, हराळ अशी रानटी मुळं खणून काढायची. त्याची मुळं जनावरांना खाऊ घालायची. जनावरं कसंबसं जगायची आणि त्यांच्या दुधावर घर चालायचं. आजच्या पिढीला ही गोष्ट ऐकली तर कदाचित विश्वास बसणार नाही; पण त्या पिढीने तो काळ आपल्या डोळ्यांनी पाहिलाय, सोसलाय आणि पार केलाय.

त्या वेळच्या माणसाकडे साधनं कमी होती, पण निसर्गाची ओळख मोठी होती. कोणती वनस्पती जनावराला चालते, कोणती मुळं उपयोगी पडतात, कोणत्या परिस्थितीत काय करायचं, हे त्यांना अनुभवातून माहीत होतं. म्हणूनच संकट कितीही मोठं असलं तरी त्यांनी संसार आणि जनावरं जगवली.

आज आपल्याकडे सुविधा आहेत, बाजार आहे, वाहतूक आहे, धान्याची साठवणूक आहे. पण तरीही शेतीवरचं संकट कमी झालेलं नाही. उलट शेतीचा खर्च वाढला, पाण्याची गरज वाढली आणि हवामानाचा अंदाज अधिकच अनिश्चित झाला.

म्हणूनच कदाचित पुन्हा “इलू-मिलूची ज्वारी” खाण्याची वेळ येईल की काय, अशी भीती मनात डोकावतेय. हा शब्द फक्त अन्नाचा नाही, तर त्या काळातील जगण्यासाठीच्या संघर्षाचा आहे.

दुष्काळ म्हणजे फक्त शेतात पीक न येणं नाही. दुष्काळ म्हणजे विहिरीचा तळ दिसणं, जनावरांच्या डोळ्यात चाऱ्याची वाट पाहणं, घरातल्या धान्याच्या कोठाराकडे रोज पाहणं आणि उद्याचा दिवस कसा काढायचा हा प्रश्न पडणं.

७२ चा दुष्काळ आपण पाहिलेला नाही, पण तो सोसलेल्या माणसांच्या आठवणी अजून जिवंत आहेत. आजच ऊन, कोरडी माती आणि पाण्याची चिंता पाहताना त्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात.

निसर्गापुढे माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याची खरी ताकद त्याच्या जगण्याच्या इच्छेतच असते. पण यावेळी संकट आलच, तर ते ७२ सारखं येऊ नये, एवढीच काळ्या आईच्या लेकरांची प्रार्थना…

कारण शेतकऱ्याला दुष्काळ नकोय, त्याला फक्त आपल्या मातीत पुन्हा हिरव पीक उगवलेल पाहायचय.#इलू_मिलूची_ज्वारी खाण्याची वेळ येईल की काय, अशी भीती मनात डोकावतेय. हा शब्द फक्त अन्नाचा नाही, तर त्या काळातील जगण्यासाठीच्या संघर्षाचा आहे.

दुष्काळ म्हणजे फक्त शेतात पीक न येण नाही. दुष्काळ म्हणजे विहिरीचा तळ दिसण, जनावरांच्या डोळ्यात चाऱ्याची वाट पाहण, घरातल्या धान्याच्या कोठाराकडे रोज पाहणं आणि उद्याचा दिवस कसा काढायचा हा प्रश्न पडणं.

७२ चा दुष्काळ आपण पाहिलेला नाही, पण तो सोसलेल्या माणसाच्या आठवणी अजून जिवंत आहेत. आजचं ऊन, कोरडी माती आणि पाण्याची चिंता पाहताना त्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात.

निसर्गापुढे माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याची खरी ताकद त्याच्या जगण्याच्या इच्छेतच असते. पण यावेळी संकट आलंच, तर ते ७२ सारखं येऊ नये, एवढीच काळ्या आईच्या लेकरांची प्रार्थना…

कारण शेतकऱ्याला दुष्काळ नकोय, त्याला फक्त आपल्या मातीत पुन्हा हिरवं पीक उगवलेलं पाहायचंय.

लेखन – श्याम मगर, लातूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button