सोलापूर

काँग्रेसचे प्रवक्ते हणुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ माढ्यात तहसीलदारांना निवेदन..

 

माढा ( प्रतिनिधी )काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते हणुमंत पवार यांच्यावर परवा दिवशी पुणे येथे पुढारी वृत्तवाहिनीवरील एका थेट राजकीय चर्चा तसेच; संवादानंतर कार्यालयाच्या बाहेर आल्यावर भाजपच्या तुषार दामगुडे व, इतर काही पदाधिकारी लोकांनी बंदुकीचा धाक दाखवत हल्ला आणि मारहाण केल्याच्या गंभीर कृत्याच्या निषेधार्थ आज रोजी माढा येथे पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना एक जाहीर निवेदन देण्यात आले.

सार्वजनिक व, राजकीय जीवनात कार्यरत असलेल्या एखाद्या व्यक्तीवर शस्त्राचा धाक दाखवून प्राणघातक हल्ला करणे ही बाब केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून ती आपल्याला भारतीय संविधानाने हमी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य यांवर थेट आघात करणारी आहे.

सदर घटनेत सहभागी हल्लेखोर व्यक्ती हे उजव्या विचारसरणीशी संबंधित असून कोणत्याही कट्टर विचारसरणीच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी हिंसाचाराचा अवलंब करणे हे लोकशाहीविरोधी व, संविधानविरोधी असे कृत्य आहे. अशाप्रकारच्या सामूहिक हल्ल्यांमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून येथील नागरिकांच्या मुक्त व, निर्भय मतप्रदर्शनावर गंभीर परिणाम होत आहे.

सार्वजनिक शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदर प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी; तुषार दामगुडे व इतर सहभागी हल्लेखोर व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात संघटित गुन्ह्याच्या अनुषंगाने कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी; धाक दाखविण्यात आलेल्या बंदुकीची तात्काळ जप्ती करून तिचा शस्त्र परवाना आहे किंवा, नाही याची सखोल तपासणी करण्यात यावी; चौकशी व, खटला प्रलंबित असताना हिंसाचाराला वैचारिक व्यासपीठ मिळू नये व सार्वजनिक शांतता भंग होऊ नये ह्या उद्देशाने तुषार दामगुडे व संबंधित व्यक्तींना वृत्तवाहिन्या व सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय चर्चांमध्ये सहभागी होण्यावर प्रतिबंध घालण्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात यावी; प्रवक्ते हणुमंत पवार तसेच, काँग्रेस पक्षाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक ती पोलीस संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी; भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक व, कायदेशीर उपाययोजना तात्काळ राबवाव्यात अशा अनेक मागण्या यावेळी काँग्रेस पक्षाच्या येथील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून तहसीलदारांकडे करण्यात आल्या.

ह्या अत्यंत गंभीर व, लोकशाही विरोधी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी याठिकाणी सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सरचिटणीस जहीर मणेर यांनी केली. राज्य शासनाच्या दरबारी सदर निवेदनाच्या माध्यमातून पक्षाच्या मागण्या कळविण्यात याव्यात अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस सचिन खैरे-पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज साठे, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका उपाध्यक्ष जमीर सय्यद, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमर राकुंडे, वाकाव गांवचे ग्रामपंचायत सदस्य भारत खंडागळे, दत्तात्रय सावंत, बाबासाहेब ओहोळ, सलीम पिंजारी, जहांगीर काझी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button