टॉप न्यूज
अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण भरले १०० टक्के !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
.अक्कलकोट तालुक्याची वरदायनी म्हणून ओळख
असलेला कुरनुर धरण बुधवारी रात्री ८.०० वाजता १००% भरले आहे . या प्रकल्पच्या ३ दरवाज्यातून २१० क्युसेस ने पाणी बोरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
बोरी कुरकुर धरण कधी भरणार याची तालुकावासीया नां प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली . बोरी कुरनुर धरणावर पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणात येणारा प्रवाह वाढल्यामुळे या खालील सांगवी बणजगोळ गोडगाव खुर्द . मिरजगी रुद्देवाडी संगोगी ब ‘बबलाद सातनदुधनी हे आठ बंधारे या सोडलेल्या पाण्याने भरण्याची अशा निर्माण झाली आहे . कुरनुर धरणावर तालुक्यातील ५१ गावाचा व तीन नगर पालिका अक्कलकोट मैंदर्गा दुधनी शहराचा पाणी पुरवठा प्रश्न यामुळे सुलभ झाला आहे .पाणी टंचाई दुर होण्यास मदत होणार आहे . कुरनूर धरण भरल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
