कर्म हाच धर्म (धम्म )

माणूस हा नेहमी पूजा पाठ, रीती रिवाज, परंपरा यामध्ये आपला धर्म शोधत असतो. परंतु माणसाचे कर्म
हा त्याचा खरा धर्म असतो.
एके दिवशी बुद्ध एका गावात गेले होते त्या गावातील लोक धार्मिक होती परंतु ती एकमेकांचा द्वेष, राग, करीत असत.
गावातील प्रमुख तथागत बुद्धांना म्हणाला. आम्ही सर्व लोक धम्माप्रमाणे वागतो परंतु आमच्या मनामध्ये शांती नाही.
तथागत बुद्ध म्हणाले, धर्म हा केवळ पूजा , परंपरा यात नाही तो प्रत्येक माणसाच्या कर्मामध्ये आहे. जर तुमचे कर्म योग्य नसतील तर तुमची पूजा देखील व्यर्थ आहे. जर आपण मनापासून दुसऱ्याची सेवा करता. जेव्हा आपलं कर्म दुसऱ्याचे कल्याण करतात. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने धर्माचे पालन करतो.
तथागत बुद्ध पुढे म्हणाले. एक मनुष्य मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा करतो. परंतु बाहेर आल्यानंतर दुसऱ्या लोकांना शिवीगाळ करतो. त्यांना नको नको ते बोलतो. त्यांचा राग ,द्वेष करतो. तर त्याची पूजा त्याला धर्माच्या मार्गावर घेऊन जाते का ?
तेथील लोकांनी उत्तर दिले. नाही.
तथागत बुद्ध पुढे म्हणाले आता पुढे पहा. एक शेतकरी आहे. तो आपल्या शेतामध्ये राबवून मेहनत करतो आपल्या कुटुंब चांगला पद्धतीने चालवतो. एवढंच नाही तर शेजाऱ्यांकडे चांगला वाटतो. त्यांना देखील मदत करतो. तो जरी मंदिरात गेला नाही तरी त्याचे कर्म हेच त्याचा धर्म आहे. कारण त्या शेतकऱ्याने आपल्या कर्मानेच सत्य आणि दुसऱ्यांना मदत करणे त्यांची सेवा करणे हे काम तो करत असतो.
धर्माचे पालन करण्यासाठी आपले कर्म शुद्ध आणि स्वच्छ असायला पाहिजे.
खरोखरच प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्माला धर्म मानले आणि त्याप्रमाणे आचरण केले. आपला समाज सुखी होऊ शकतो.
एक वृद्ध व्यक्ती मध्येच उठला आणि त्यांनी तथागत बुद्धांना विचारले. तथागत माणसाचे प्रत्येक कर्म धर्म होऊ शकते. त्यांनी आपल्यासाठी
स्वतःच्या हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी
केलेले कर्म हे धर्म होऊ शकते का ?
तथागत बुद्ध म्हणाले. माणसाचे प्रत्येक कर्म धर्म होऊ शकत नाही. जर त्या कर्मामध्ये सत्य अहिंसा आणि परोपकार असेल तरच ते कर्म धर्म होते. जे कर्म स्वार्थ, लालच आणि अहंकारानी युक्त आहे. ते धर्म कधीच होऊ शकत नाही. ते फक्त कर्म होते. धर्म म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला सुख शांती मिळते तो धर्म होय.
तथागत बुद्ध म्हणाले . एक व्यापारी होता. त्याला धर्माचं काही देणं घेणं नव्हतं. एक दिवस त्या गावांमध्ये दुष्काळ पडला. त्यांनी आपल्या संपत्तीने गावातील लोकांसाठी धन्य धान्याचा पुरवठा केला. त्यांनी कोणतीही पूजा केली नाही. ना कोणते धार्मिक अधिष्ठान केले. परंतु त्याच्या या कर्माने सर्व गावाला वाचवले. काय हे कर्म धर्म नव्हते का ?
सर्व लोक बोलू लागले. हो तो धर्मच होता. धर्म म्हणजे पूजा नाही. फक्त आपण निस्वार्थीपणाने आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता का काम करता ते म्हणजे धर्म होय.
बुद्धांच्या या उपदेशाने लोकांना समजले . केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे, मंत्र जपणे म्हणजे धर्म नाही आहे. खरा धर्म आहे भुकेल्याला अन्न देणे. जर दुःखी आहे त्याचे सांत्वन करणे. आपला शेजाऱ्याला मदत करणे. हाच खरा धर्म.



