Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वारकरी संप्रदायात धर्मांध आणि प्रतिगामी प्रवृत्तींचा शिरकाव – शरद पवार

Admin by Admin
April 11, 2026
in देश - विदेश
0
वारकरी संप्रदायात धर्मांध आणि प्रतिगामी प्रवृत्तींचा शिरकाव – शरद पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

​नवी दिल्ली – दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या एका स्मरणिकेतून ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. वारकरी संप्रदाय हा समतेचा विचार देणारी चळवळ असून, या चळवळीत सध्या प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संप्रदायात तब्बल ६० टक्के व्यक्तींची मांडणी ही प्रामुख्याने धर्मांध शक्तींना अधिक बळ देणारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रबोधनाच्या या मार्गावर दुर्दैवाने महिलांचा सहभाग नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

​शनिवारी दिल्लीत महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत असून, ग्रंथदिंडीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी या संमेलनाचे उद्घाटन संपन्न होईल. याच संमेलनाच्या स्मरणिकेत, आपण केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी स्वतंत्र धोरण का राबवले, यावरही शरद पवार यांनी प्रकाश टाकला आहे.

​आपल्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डात महिलांसाठी असलेल्या एकमेव जागेवरून त्यांच्या आईची निवड झाली होती. त्या काळी प्रवासासाठी एसटी बस नव्हे, तर केवळ खासगी मोटार असायची. तरीही त्यांच्या आई अत्यंत अभ्यासू वृत्तीने आणि कोणतीही बैठक न बुडवता काम पाहत असत.

​समतेचा पुरस्कार करणाऱ्या वारकरी संप्रदायात वाढत्या प्रतिगामी शिरकावाविषयी अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून काही लोक कट्टरतावादी विचारांना बळ देत आहेत. यावर उपाय म्हणून, संप्रदायात पुरोगामी विचार रुजवू शकणाऱ्या सुमारे ४० कीर्तनकार व प्रवचनकारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अशा पुरोगामी विचारांच्या लोकांची आज नितांत आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले.

 

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये सत्ता दिल्यास अवघ्या ६ महिन्यांत समान नागरी कायदा लागू करणार – गृहमंत्री अमित शाह

Next Post

राज्यात महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ पदांची महाभरती

Admin

Admin

Next Post
राज्यात महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ पदांची महाभरती

राज्यात महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ पदांची महाभरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157114
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697