सामाजिक

दुधनीतील परमशेट्टी प्रशालेतील दहावी विद्यार्थ्यांना निरोप 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेतील दहावी विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शारदा मातेचा पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत  सातलिंग गुळगोंडा यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार  करण्यात आले.  प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलीगावे यांनी प्रास्ताविक भाषणात वार्षिक अहवाल सादर केले. यावेळी दहावी अ ब क या वर्गातून आदर्श विद्यार्थी म्हणून लक्ष्मी सोबान, लक्ष्मी परमशेट्टी , प्रज्वल कोळी यांची निवड करून त्यांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी आदर्श विद्यार्थ्यांनी आपले मनोगतात प्रशालेतील शिक्षकांबद्दल आदर भावना व्यक्त केल्या. लक्ष्मी परमशेट्टी हिने  अप्रतिम भाषण केले. यावेळी दुधनीतील सुपुत्र व परमशेट्टी प्रशालेचे माजी विद्यार्थी  महांतेश कोळी यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण व एसएससी मार्च २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस  देऊन गौरव करण्यात आले.  माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी आपल्या मनोगतात   विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना सीसीटीव्ही कॅमेरे आहे म्हणून  न घाबरता धैर्याने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात सिद्धाराम म्हेत्रे यांनी सुशिक्षित बरोबर सुसंस्कारित असणे ही काळाची गरज आहे आणि तसे विद्यार्थी घडवण्याचं कार्य शिक्षकाने करावे असे सांगत विद्यार्थ्याने आपण कोणत्याही फिल्डमध्ये गेलात तर आपण सर्वोत्कृष्ट कार्य करत राहायला पाहिजे असे आवाहनही केले व परीक्षेत घाबरू नये म्हणून गमतीजमती गोष्टी देखील सांगितले. यावेळी शिक्षक मल्लय्या स्वामी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.  दहावी अ ब क विद्यार्थ्याकडून २५ खुर्ची प्रशालेस भेट दिले.  याप्रसंगी संस्थेचे संचालक सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाडी , सुभाष परमशेट्टी , सिद्धाराम येगदी, शिवानंद माडयाळ यशवंतप्पा परमशेट्टी , युवा नेते बसवराज हौदे, प्रशांत लोणी , संजय मंथा संतोष जोगदे रेवणसिद्ध माशाळ , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा राखी खंडाळ  ,ज्योती माळगे , मल्लिनाथ कोटनूर ,पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर पाटील व श्रुती दिवटे यांनी केले तर मान्यवरांचे आभार अविनाश भैरूणगी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button