Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आरक्षण यात्रेच्या समारोपाची सभा ओबीसींचा राजकीय चेहरा असेल – एड. प्रकाश आंबेडकर

Admin by Admin
July 29, 2024
in राजकीय
0
आरक्षण यात्रेच्या समारोपाची सभा ओबीसींचा राजकीय चेहरा असेल – एड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

ॲड. प्रकाश आंबेडकर : ओबीसींनाच आरक्षणाचा लढा लढायचा आहे हे ध्यानात घ्या

सोलापूर : ज्या प्रमाणे आपण समाजाच्या मेळाव्यात उपस्थित राहतो, त्या प्रमाणे ओबीसी मेळाव्याला सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे. 7 तारखेच्या औरंगाबाद येथील सभेला जर तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर तो ओबीसींचा राजकीय चेहरा असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान सोलापूर येथील सभेत व्यक्त केले.

सर्व ओबीसी नेत्यांनी चर्चा करायला पाहिजे की, आरक्षणाच्या बाबतीत भाजपची भूमिका काय आहे? त्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे की विरोध आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, भीतीतून बाहेर यायचे असेल, तर संघटित होणे गरजेचे आहे यातून ताकद दिसते. 7 तारखेला औरंगाबाद येथील जाहीर सभेला सर्व ओबीसींनी स्वतःच्या वाहनाने आले पाहिजे. हे जर ओबीसी करू शकले नाहीत, तर आमच्यासारखे कितीही आले तरी तुमचं आरक्षण वाचवू शकणार नाहीत. निवडणुका होईपर्यंत कोणताही पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडणार नाही. ओबीसींना स्वतःचा लढा स्वतःच लढायचा आहे हे लक्षात घ्या.

ॲड. आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार हे राजकीय नेते नाहीत, तर एका समाजाचे नेते आहेत. त्यामुळे ते समाजाच्या बाजूनेच उभे राहतील.

मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. पण भाजप त्यांना विरोधही करत नाही आणि समर्थन सुद्धा देत नाही. पण भाजपचा त्यांच्या मागण्यांना छुपा पाठिंबा आहे. यामध्ये ओबीसींना फसवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुढं करून असे सांगितले जात आहे की, हाच आपला तारणकर्ता अशा प्रकारे ओबीसींची फसवणूक होत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Previous Post

टाकराळा अपघातातील मृत्तांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत

Next Post

शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न..!

Admin

Admin

Next Post
शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न..!

शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697