Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मावळ हत्याकांडाची चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करा

Admin by Admin
July 27, 2024
in सामाजिक
0
मावळ हत्याकांडाची चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या
शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अक्कलकोट ( प्रतिनिधी: ) चार दिवसांपूर्वी मावळ येथे घडलेल्या हत्याकांडाप्रकरणी प्रशासनाने एनडीआरएफची टीम 
वाढवून मृतांचा शोध घ्यावा आणि त्यांना ५० लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे,या मागणीसाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.ही भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली.मुख्यमंत्र्यांनी या विषयासाठी बराच वेळ दिला होता.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हेत्रे यांनी दिलेल्या निवेदनांची तातडीने दखल घेत संबंधित विभाग तसेच प्रशासनाला मदतीसंदर्भात आदेश दिले आहेत.विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा निवेदनाची दखल घेत पुण्याचे जिल्हाधिकारी व सीपी यांना तात्काळ फोनद्वारे संपर्क साधला व आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.मदतीसंदर्भात प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले.
         चार दिवसांपूर्वी मावळ येथे जी घटना घडली होती.त्यामध्ये मूळचे अक्कलकोटची गवंडी आणि तिकडचे समरीन नेवरेकर कुटुंबियातील ती महिला होती आणि तिचे दोन लहान मुले होते.या तिघांना अमानुष पद्धतीने मारून इंद्रायणी नदीत टाकून देण्यात आले 
होते.त्या तिघांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे पण त्यात आणखी वाढ गरजेची आहे.
हा विषय गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,पीडितांना या प्रकरणात न्याय मिळणे महत्वाचे आहे,असे मुस्लिम समाजाचे नेते अशपाक बळोरगी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना म्हेत्रे म्हणाले की, मावळमधील घटना ही अतिशय दुर्दैवी आहे,अशी घटना कोणाच्याही बाबतीत होऊ नये.गवंडी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे,त्यांना आर्थिक मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी होती,असे त्यांनी सांगितले.यावेळी सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील व गवंडी कुटुंबिय उपस्थित होते.
म्हेत्रेंकडुन अडचणीतील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदने..
मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा रखडलेला पिक विमा मिळावा,चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेला 
वाढीव दर मिळावा व त्यासंदर्भात त्वरित बैठक लावावी,सोलापूर जिल्ह्यातील जलजीवनमधील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावेत,दुधनी नगरपालिकेला विशेष निधीतुन ५ कोटी रुपये मिळावेत.दुधनीचे प्रशासक सीईओ आतिश वाळुंज यांची बदली करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले.
या सर्व प्रश्नांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी चर्चा केली.याप्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Previous Post

चि. गणेश निंगदळे च्या वाढ दिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व वृक्षारोपण

Next Post

आमदार धीरज देशमुख यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार

Admin

Admin

Next Post
आमदार धीरज देशमुख यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार

आमदार धीरज देशमुख यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697