सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील- गौडगांव बु मागासवर्गीय १५ टक्के खर्चात भ्रष्टाचार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील- गौडगांव बु मागासवर्गीय १५ टक्के खर्चात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मागासवर्गीय बांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी सोलापूर व गटविकास अधिकारी अक्कलकोट यांना देण्यात आले आहे.
 गौडगाव बु येथील भिम नगर येथील सर्व नागरिकांनी  सन २०२१-२२ ते २२ ते२३ या वर्षातील १५% खर्च केले किंवा नाही हे चौकशीसाठी आले असता  विस्तार अधिकारी यांना हि माहिती ग्रामपंचायत कडून मिळाले नाही.मागासवर्गीय निधी १५% सन २०२३ ते २०२४ मध्ये दलित वस्ती येथे समाज मंदिर रंगरगोटी व लाईट फिटिंग या कामासाठी रक्कम रुपये २५,०००/- रुपये खर्च करण्यात आले असे दिनांक ०३/०६/२०२६ या पत्रानुसार विस्तार अधिकारी यांनी लेखी दिले आहे. त्या अनुषंगाने  सर्व भिमनगर मधील रहिवाशी यांनी  २५ हजार रुपयाचा निधी  समाज मंदिर रंगरगोटी व लाईट फिटिंग साठी अजीवबात १ रुपये ही खर्च करण्यात आलेले नाही. ग्रामसेवक संबंधित अधिकारी व सरपंच या सर्वांनी हात मिळवणूक करून मागासवर्गीय यांचे १५% निधी २५,०००/- रुपये उचलून दलित समाजाला  दिशाभूल केले आहे. तरी संबंधित विषयास जे कोणी अधिकारी जिम्मेदार असेल त्यावरती त्वरित फौजदारी गुन्हा 
पंचायत समिती, अक्कलकोट यांनी दाखल करून जे २५,०००/- रुपये रक्कम हडपले आहे ते वसूली करून गौडगांव बु भिम नगर समाज मंदिर मध्ये लाईट फिटिंग पूर्ण करून द्यावे.
मागासवर्गीय १५% निधी सन २०२४ ते २०२५ मध्ये खर्चपोटी साऊंड सिस्टीम खरेदी साठी २७,५००/- रुपये खर्च करण्यात आले. सध्या आपल्या भिमनगर येथे जे या लोकांनी साऊंड सिस्टिम खरेदी दाखवून २७,५००/- रुपये उचलले आहे. ते कोणत्या ही वस्तू समाज मध्ये नाही. केवळ पावती जोडून १५% पैसे निधी गैर प्रकार केले आहे. या अधिकारी विरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करून जे २७,५००/- उचलले आहे. ते वसूली करून ते साऊंड सिस्टिम आणून द्यावा अशी मागणी गौडगाव बु मधील मागासवर्गीय नागरिकांनी केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बसवराज गजधाने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अक्कलकोट गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर अंबाजी पिरपा शिंगे , भिमशा कृष्णा गजधाने , सुरेश लक्ष्मण गजधोने , खाजप्पा ओजप्पा बनसोडे ,शामराव पिरपा शिंगे , ओंकार खाजप्पा बनसोडे ,परमेश्वर मल्लिकार्जुन शिंगे ,रतीकांत अंबरान भणगे, लक्ष्मण भिमशा बनसोडे आदीच्यां स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button