सामाजिक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राष्ट्रीय नेते , खासदार संजय राऊत व सुषमा आंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक वसंत देडे , जिल्हा उपप्रमुख मनोज पवार , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ता. अध्यक्ष प्रा. प्रकाश सुरवसे , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष माणिक बिराजदार अनिल झंपले ,रोहित डोलारे आदींच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले याप्रसंगी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक वसंत देडे म्हणाले शिवसेना पक्षाची विचारधारा ही ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण असून या विचारधारे प्रमाणेच अक्कलकोट तालुक्यात शिवसेना पक्षाचे काम सुरू आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय नेते खासदार संजय राऊत यांची आक्रमक विचारधारा ही तमाम शिवसैनिकांना बळ देते.वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळत शिवसेनेच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित रुग्णांना फळे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला अशी माहिती वसंत देडे यांनी दिली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी
गंगाराम राठोड सह कर्मचारी , नर्स आदी उपस्थित होते.



