सामाजिक

तथागत बुद्ध विहार बालाजी नगर भोसरी या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प १५वे संपन्न

पिंपरी चिंचवड – ( अशोक शिवशरण)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा 
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अंतर्गत तालुका क प्रभाग तथागत बुद्ध विहार बालाजी नगर भोसरी या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प १५वे पुष्प -रविवार दिनांक ०४/१०/२०२६रोजी गुंफण्यात आले. प्रवचनकार शिलरत्न बाणे गुरुजी
( भारतीय संविधान प्रबोधन प्रशिक्षण केंद्र भोसरी/भा.बौ.म.स.ता ई प्रभाग संघटक)
यांचे परमपूज्य महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे झाले हा विषय अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्ञा शिल करूणा त्याग तसेच दहा पारमितांचे पुर्णपणे पालनकरुन तथागत सम्यक संबुद्ध यांच्या अगोदरची पायरी पर्यंत कसे पोहोचले व त्यांना बोधिसत्व ही उपाधी कोणी केव्हा व कुठे दिली. हे सर्व प्रवचनाच्या विषयातून उपस्थितांना महामानवाच्या जीवनातील प्रसंगासह समजावून सांगितले कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आदर्शांचे पुष्प दीप धूपाने पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भिमस्मरण भीम स्मृति ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजिनाथ येडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनिषा इंगळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button