सामाजिक

राज्यात भयानक दुष्काळी परिस्थिती ,  नागरिकांना वेळेवर राशन माल वाटप करण्याची मागणी

 

माई-बाप सरकार आमची वेळ खराब राशनवर जगु द्या

माजलगांव ( नाजेर कुरेशी )सद्या राज्यात सर्वत्र भयानक दुष्काळ पडला आहे. हातावर पोट असणारे गोर गरीब हाताला काम नसल्यामुळे दुष्काळीचा सामना करत आहेत. तसेच माजलगाव शहरात राशन दुकानदार किरकोळ राशन वाटप करू लागले आहेत. 
खुपच भयानक परिस्थिती निर्माण झालेली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराच्या संधी कमी झाल्यामुळे अनेक गरीब व गरजू कुटुंबांना दैनंदिन अन्नधान्याची आवश्यकता भासत आहे.
त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनामार्फत एका व्यक्तिला पांच किलो मोफत वाटप होणारे राशन पुरत नाही प्रशासनाने उपलब्ध होणारा तांदूळ, गहू, डाळी व इतर आवश्यक अन्नधान्याचा राशन माल गरजू एका व्यक्तीस दहा किलो प्रमाणे तातडीने व योग्य प्रमाणात वाटप करण्यात यावा, अशी मांगणी नागरिक करत आहे तसेच कोणताही पात्र नागरिक या सुविधेपासून वंचित राहू नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.
तरी सदरील मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना लवकरात लवकर प्रशासनाने एका व्यक्तिला दहा किलो प्रमाणे राशन माल वाटप करावा दुष्काळीचा विचार करूण भरपुर राशन माल उपलब्ध करून द्यावा दुकानदार यांना वेळेवर माल वाटप करण्याचे सुचना करावी तसेच जनावर प्राण्यांना चारा पाण्याची व्यवस्था करावी
असे सर्व नागरिक मागणी करूं लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button