राजकीय

अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू –  आमदार रोहित पवार 

अक्कलकोट (प्रतिनिधी )
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी कष्टकरी,  शेतमजूर यांच्यासमोर जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना पाच हजाराची तुटपुंजी मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आणि शेतमजूरांना प्रतिकुटुंब पंचवीस हजार रुपये सरकारने मदत द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी तडवळ ता.. अक्कलकोट येथील शेतकरी मेळाव्यातून दिला.
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे कै. सिद्रामप्पा पाटील प्रतिष्ठान आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सुनील भुसारा, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, आनंद तानवडे, आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  दिलीप सिद्धे, शिवराज म्हेत्रे , जि प माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.. प्रकाश सुरवसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिवानंद पाटील यांनी प्रास्तविकातुन मेळाव्याचा हेतू सांगितला. आमदार रोहित पवार यांनी उजनी धरणावरील ए आय डेटा सेंटर व अन्य प्रकल्पचे तोटे सांगितले. हा प्रकल्प शेतकरी विरोधी व अन्यायकरक असल्याचे अमेरिकेतील दाखले उदाहरणे देत सविस्तर माहिती दिली. 
सकाळी सात वाजल्यापासून स्वामी समर्थ दर्शन घेऊन सुरु झालेल्या दौऱ्यात नायकवाडी गल्ली व बेडर गल्ली परिसरातील नागरिकांचे प्रश्न व नगरपरिषद प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाची माहिती घेतली. जेऊर येथील कनोजी या शेतकऱ्याच्या शेतातील घरी भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. मिरचीचे पीक जगवण्यासाठी दुभती जनावरे  विकून टँकरने पाणी दिले तरी पीक हाताशी आले नाही मुलींच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही त्यामुळे मुलाचे शिक्षण अर्धवट सोडवले. यावेळी रोहित पवार यांनी बारावी झालेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश सुरवसे यांच्यावर सोपवली. व अडचणीच्या काळात राष्ट्रवादी परिवार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. करजगी येथील शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या करपलेल्या बागेला भेट देऊन व्यथा जाणून घेतली. या संपूर्ण दौऱ्याचे यशस्वी नियोजन तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे व ओमप्रकाश कत्ते 
 यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button