सामाजिक

दुष्काळाच्या काळात रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आर्थिक भुर्दंड; सर्व तपासण्या तातडीने सुरू करा : नुमान चाऊस

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत रक्त तपासण्या बंद?
माजलगाव | प्रतिनिधी ( नाजेर कुरेशी )
माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील व्हिटॅमिन डी-३, बी-१२, सीआरपीसह काही महत्त्वाच्या रक्त तपासण्या बंद असल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक आधीच आर्थिक संकटात असताना मोफत तपासण्या बंद असल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडत असून शासनाच्या मोफत आरोग्यसेवेचा उद्देश बाधित होत असल्याची भावना आहे. वरिष्ठ स्तरावरून काही तपासण्या बंद करण्याबाबत सूचना मिळाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश सावळे यांनी सांगितले आहे. दुष्काळाच्या काळात गरीब रुग्णांना आणखी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व बंद रक्त तपासण्या तातडीने सुरू कराव्यात तसेच तपासण्या बंद ठेवण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी मौलाना आझाद युवा मंच, बीडचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे.सदर मागणीची तातडीने दखल घेऊन बंद असलेल्या सर्व तपासण्या सुरू न केल्यास, मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button