अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हा प्रभारी तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी २०२९ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक तयारीला आतापासूनच सुरुवात करून पक्षाची ताकद बूथ पातळीपर्यंत अधिक भक्कम करण्यावर यावेळी भर दिला.
भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा मूळ आधार आहे. त्यामुळे बूथ, शक्तिकेंद्र आणि मंडल स्तरावरील संघटन अधिक सक्रिय करताना नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या प्रश्नांमध्ये सहभागी होणे आणि पक्षाची भूमिका व सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे, याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी काळात संघटनेतील प्रत्येक घटकाने एकजुटीने आणि जबाबदारीने काम करण्याचे देखील आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक . विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष . शशिकांत चव्हाण, जिल्हा प्रभारी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस . विकास वाघमारे, जिल्हा सरचिटणीस संतोष मोगले, पश्चिम महाराष्ट्र कार्यालयीन प्रमुख . योगेश बाचल, राज्य परिषद सदस्य . शिवशरण जोजन, राजेंद्र सुरवसे, रामप्पा चिवडशेट्टी, . महेश बिराजदार, . जगन्नाथ गायकवाड, सुनील खेड, . महादेव पाटील, . अमोल हिप्परगी यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, मंडल अध्यक्ष तसेच विविध मोर्चा, सेल व आघाडीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत संघटन आणि सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.







