धार्मिक
गौडगाव येथील जागृत मारुती मंदिरास पाच न्यायाधीशांनी सदिच्छा भेट व दर्शन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
तालुक्यातील प्रसिद्ध व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गौडगाव येथील जागृत मारुती मंदिरामध्ये नुकतीच पाच न्यायाधीशांनी सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.या प्रसंगी तदर्थ जिल्हा न्यायाधीश ओमशंकर पाटील,दिवाणी न्यायाधीश धनंजय हंबीरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे,दिवाणी न्यायाधीश महांतेश कुडते व डेप्युटी चॅरिटी कमिशनर ईश्वर सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व मान्यवरांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन मंदिरात पूजा-अर्चा केली.
सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमोल कुमार देशपांडे म्हणाले की,”मी यापूर्वीही दोन वेळा येथे येऊन गेलो आहे. पुन्हा पुन्हा यावे आणि दर्शन घ्यावे, असे वाटणारे एकमेव ठिकाण म्हणजे गौडगावचे जागृत मारुती मंदिर आहे.येथे दर्शन घेतल्याने मनाला एक वेगळ्याच प्रकारचे आत्मिक व मानसिक समाधान मिळते,” असे त्यांनी म्हणाले.
डेप्युटी चॅरिटी कमिशनर ईश्वर सूर्यवंशी मनोगत प्रसंगी म्हणाले की”मंदिरात चालणारे अन्नदानाचे कार्य अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाचे आहे.संपूर्ण विश्वस्त मंडळ भाविकांच्या सेवेसाठी अतिशय जागरूकतेने व तत्परतेने कार्यरत असल्याचे दिसून येते.मारुतीरायाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले,अशा शब्दांत त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.
या प्रसंगी सरपंच श्रीशैल बनसोडे,पोलीस पाटील सिद्धाराम सुतार,सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शंकर पाटील,अक्कलकोट पंचायत समितीचे सदस्य वीरभद्र सलगरे,तसेच श्रीकांत खानापुरे,सिद्राम वाघमोडे,प्रकाश मेंथे,शांतय्या मठपती,ज्ञानेश्वर फुलारी,प्रकाश नन्नवरे,रमेश वाघे,सोमनाथ कुंभार, नागनाथ कुमटगी,परमेश्वर सुतार,प्रकाश सणकळ, चौडप्पा सोलापुरे मल्लिनाथ म्हेत्रे,श्रीमंत म्हेत्रे आणि श्रीशैल कुंभार आदींची उपस्थिती होती.मंदिर समितीच्यावतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.



