महाराष्ट्र

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर

 

अकोला : अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी अकोला येथे धम्म मेळाव्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, आरक्षण, समानता आणि राजकीय सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडिया खात्यावरून भूमिका मांडली.

या पोस्टमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील मेळाव्यासाठी येताना केवळ बॅनरच नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी लढण्याचा निर्धारही सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. दीक्षाभूमी आणि महाबोधी बुद्ध विहाराला ‘आरएसएस-ब्राह्मणी मनुवादी’ नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तसेच, आरक्षणाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या कथित संस्थात्मक अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सामाजिक समता, प्रतिष्ठा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघटितपणे संघर्ष करण्याची भूमिका या पोस्टमधून त्यांनी मांडली.

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार –

२१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात होणारा धम्म मेळावा हा केवळ धार्मिक उत्सव नसून धम्म, समानता, प्रतिष्ठा आणि राजकीय सक्षमीकरणाचा शक्तिशाली आविष्कार असेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्यातून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना अधोरेखित करण्याचा आणि आंबेडकरी विचारांच्या आधारे समता व हक्कांच्या लढ्याला बळ देण्याचा संदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
अकोला येथे अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्म मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button