धार्मिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले व नगरसेवक महेश इंगळे यांचा ‘बसवलिंग रत्न’ पुरस्काराने होणार सन्मान
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, विश्व फाउंडेशन शिवपुरीचे संस्थापक
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, हृदयरोग तज्ञ डॉ.शैलेश पाटील, ख्याता उत्तर कर्नाटक जानपद कलाकार ईश्वर हिरेमठ कनकूर या मान्यवरांना यंदाचा जगद्गुरु बसवलिंगरत्न पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती नागणसूर येथील
जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीन मठाचे कार्यसेवक विद्याधर गुरव यांनी दिली.
दरवर्षी श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ, नागणसूर यांच्या वतीने श्री गुरु बसवलिंगेश्वर यांच्या १४ व्या पुण्य स्मरणोत्सवानिमित्त सालाबादा प्रमाणे दिला जाणारा मानाचा श्री जगद्गुरु बसवलिंग रत्न पुरस्कार यंदा वरील मान्यवरांना देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.२३/१०/२६ रोजी नागणसूर येथील
जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ येथे संपन्न होईल.
दि.२३-१०-२०२६ रोजी सकाळी महारुद्राभिषेक, घटस्थापना, ध्वजारोहण, श्री जगद्गुरु बसवलिंग रत्न प्रशस्ती प्रदान, सामूहिक विवाह, धर्मसभा, श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर भक्तनिवास उद्घाटन समारंभ, २१००० सुहासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम व ११००० जंगमांचा जंगमार्पण सोहळा होणार आहे. तसेच भाविकांसाठी पुरणपोळी व तुपाचे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
दि. २४-१०-२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रींच्या भव्य फोटो व वचन साहित्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक नागणसूर गावातील प्रमुख रस्त्यावरून रंगोळीच्या उद्घाटनाने निघणार असून यात श्री जगद्गुरु बसवलिंग शिवयोगी यांचे भव्यचित्र आणि धर्मध्वज असणार आहेत.



