सामाजिक

अक्कलकोट येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे भव्य मिरवणूक

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथे 
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 
डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून भव्य लेझिम ताफा मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीचे उद्घाटन  
अक्कलकोट पोलीस  उत्तर ठाण्याचे
पोलीस निरीक्षक .अविनाश पवार , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट  कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले या मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते भगवान गौतम बुद्ध , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ७०.व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भिमनगर आणि यु जी. मित्र परिवाराकडून बहारदार लेझीम खेळ सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
१३ वर्षांपूर्वी माजी नगरसेवक .उत्तम गायकवाड यांच्या संकल्पनेतून धम्मचक्र प्रवर्तन दिनी अक्कलकोट शहरात पहिला लेझीम ताफा काढण्यात आला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. सदरची मिरवणूक शहरातील भीमनगर मैंदर्गीरोड पासून ते फत्तेसिंह चौक , एवन चौक , बसस्थानक , विजय कामगार चौक , कारंजा चौक , मेनरोड बाजारपेठ , फत्तेसिंह चौक ते भीमनगरपर्यंत मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणूकीत माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , 
 तुषार  गायकवाड, सागर सुतार, संदिप गायकवाड, स्वप्निल गायकवाड, संदिप सोनकांबळे , भाईजी गायकवाड,स्वामी शिंदे,धनंजय वेसकर, संजय सुतार, रजत गायकवाड, समाधान घाटगे लखन वेसकर , योगेश मडिखांबे, लक्ष्मीपुत्र मडिखांबे, लक्ष्मीकांत इब्रामपूर,विशाल बनसोडे, निकेश मडिखांबे, रोहित पटनम, राकेश मडिखांबे, चेतन गायकवाड, पांडुरंग घाडगे, गणेश मडिखांबे .स्वामी  बनसोडे, .दत्ता मडिखांबे ,.चंद्रकांत  मडिखांबे,स्वामी  मडिखांबे
,.सतीश  सुतार,.अक्षय  सोनवणे आदीसह 
सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते संस्थे वर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवार सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button