छत्रपती शिवाजी महाराजांचीं आग्र्याहून सुटका

आज १७ ऑगस्ट…. बरोबर 360 वर्षांपूर्वी आश्चर्यकारक व धाडसी घटनांमधील जागतिक इतिहासातील एकमेवद्वितीय घटना आज घडली. १७ ऑगस्ट १६६६ ला शहेनशाह औरंगजेबाच्या भक्कम सुरक्षा कवच असलेल्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडस आणि चातुर्याने एक नियोजनबध्द योजना आखत सुटका करून घेतली.
आपल्या मातृभूमीपासून दूर अत्यंत क्रूर अश्या शत्रूच्या तावडीतून निसटणे हे खूपच अशक्य होते पण ते शक्य झाले आणि मराठ्यांच्या इतिहासातील एक ठळक घटना म्हणून त्याची नोंद झाली.औरंगजेबाने दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी रक्ताची रंगपंचमी खेळला होता.तीन भावांची कत्तल करुन दारा नावाच्या भावाचे मुंडके शहाजहान वडीलांना पेटीतून भेट देणारा औरंगजेबाचे हे एकच उदाहरण.निर्दयता,दयाशून्य,भावनाशून्य,क्रुरता यांची परिसिमा पार करते.जपाची माळ जपणार्या याच्या डोक्याने मेंदूने किती कत्तली,खून घडवून आणले असतील.
पाताळयंञी औरंगजेबाचे आमंञण म्हणजे मृत्यूला निमंञण होते.तानाजी मालुसरे,येसाजी कंक,हिरोजी फर्जद,मदारी मेहतर,सर्जेराव जेधे,बाजी जेधे,बाळराजे संभाजी यांच्यासह निवडक 400 मावळ्यांना घेऊन राजे राजगडावरुन आग्र्यास आले.औरंगाबादच्या खजिन्यातून वाटखर्चासाठी एक लाख रुपये मंजून केले होते.राजांचे अडीच हजार गुप्तहेर आग्रा परिसरात वावरत होते.आग्रा ते राजगड गुप्तहेरांची एक साखळी निर्माण केली होती.सेनापती प्रतापराव गुजर यांना स्वराज्यातच ठेवले होते.आग्रा भेटीत येण्यापूर्वी जिजाऊ माँसाहेबांकडे सर्व स्वराज्याची जबाबदारी दिली होती.शिवरायांच्या स्वागताची जबाबदारी मिर्झाराजे जयसिंह यांचे सुपुञ रामसिंग यांच्याकडे होती.पण ऐनवेळी रामसिंगास औरंगजेबाच्या राजवाड्याभोवती गस्त घालण्याचे काम देण्यात आले.रामसिंगास राजांपासून दूर ठेवण्यात आले.राजांच्या स्वागताला रामसिंहाचा कारकून गिरीधरलाल मुन्शी आला होता.राजांची व्यवस्था धर्मशाळेत करण्यात आली.राजांना अग्र्यापर्यंत राजाप्रमाणे वागविले होते.एखाद्या शहजाद्याप्रमाणे वागिविले.माञ आग्र्यात प्रवेश केल्यापासून अपमानांची मालिका सुरु झाली.प्रत्येक घटना राजांच्या मनाला वेदना देत होती.राजे सहनशीलपणे सर्व सहन करीत होते.राजमहलाच्या प्रवेशद्वारावर शिवरायांची मावळ्यांची सर्वांची शस्ञे काढून घेण्यात आली.औरंगजेबाची भेट घेताना दरबारात कुर्निश करण्याची पध्दत होती.कुर्निश म्हणजे जमिनीवर कपाळ टेकवून बादशहासमोर जमिनीचे चुंबन घेणे.शिवाजीराजे दरबारात आले.राजांनी कुर्निश केला नाही.फक्त मुजरा केला.औरंगजेब आणि त्याचे सरदार पाहत होते.दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास बादशहाचे दोन दरबार होते.दिवाण-ए-खास हा दरबार अमीर उमराव,वजीर,उच्च अधिकारी यांचीच बादशहा भेट घेत असे.प्रत्येक दरबाराचे कामकाज दोन तास चालत होते.राजे आले तेव्हा दिवाण-ए-खास चे कामकाज संपलेले होते.राजे दिवाण-ए-आममध्ये भेटण्यास गेले.कारण राजांची भेट दिवाण-ए-आम मध्ये ठरली होती.राजांच्या पुढे जसवंत सिंगास उभे करण्यात आले.राजांनी मानसन्मानाची अपेक्षा नव्हतीच.पण राजांना जाणीवपुर्वक अपमानीत करण्यात येत होते.औरंगजेबासमोर बोलताना उंच स्वरात न बोलता हळू आवाजात तोंडासमोर हाथ ठेवून बोलण्याची पध्दत होती.राजे भर दरबारात कडाडले,”रामसिंग हमारे आगे ये कौन खडा है? हमारे सैनिकोँ को पीठ दिखाकर जो जसवंतसिंग दख्खन से सिंहगड के युध्द से भाग गया उस जसवंतसिंगको हमारे सामने खडा किया है? जसवंतसिंग तुम्हारे पिताजी और बादशहा भी जानते है की,हम कोन है.कुतूबशहा आणि आदिलशहा आमची कृपा व्ही म्हणून विनंती करतात.आमचा आणि त्यांचा बरोबरीचाच दर्जा.अपमान सहन करणार नाही”.औरंगजेब म्हणतो,”सिवा को खिलत दे दो|”
खिलतीचे ताट राजे दूर उडवतात आणि म्हणतात,”या अशा खिलती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो.बादशहाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही.अरे आम्ही पाचशे कोसांवरुन येतो आणि आमचे स्वागत रामसिंगाचे कारकून करतात.अरे तुझ्या बादशहाला दुनियादारी कळते का नाही” रामसिंग राजांना शांत करण्याचा प्रयत्न करतात.म्हणतात,राजे शांत व्हा याचे परिणाम फार वाईट होतात.हातात हात घेऊन रामसिंग समजवतात.पण राजे हात सोडवून घेतात आणि म्हणतात,”परिणामांची पर्वा करीत नाही आम्ही रामसिंग.मरणाला मरण मानत नाही.आम्ही मरण मानतो लाचारीला आम्ही मरण मानतो आमच्या अपमानाला.सर्व दरबारात वाढदिवसादिवशी स्मशान शांतता पसरली होती.औरंगजेबाला पाठ दाखवून शिवराय ताठ मानेने निघून गेले.दरबारी रितीरिवाजानुसार बादशहाला पाठ दाखविणे हा गुन्हा ठरत होता.बाळराजे संभाजी राजांनी राजांचेच अनुकरण केले.सर्व आग्र्यात शिवरायांचीच चर्चा होती.शिवरायांनी राजाने औरंगजेब बादशहाला खडे बोल सुनावले.शिवरायांच्या निखार्यासारख्या शब्दांनी औरंगजेबाच्या कानात कुणीतरी तप्त शिश्याचा रस ओतण्याचा भास झाला.दिल्लीच्या तख्ताला खडे बोल सुनावणारा औरंगजेबाला आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी भेटले होते.औरंगजेबाची बहिण जहाँआरा बेगम हिला शहाजहानच्या काळापासून सुरतेचा महसूल खर्चासाठी मिळत होता.सुरत लुटल्यामुळे शिवरायांच्या बध्दल संतापाचा उद्रेक जहाँआराच्या मनात निर्माण झाला होता.जहाँआरा बेगमने आपल्या भावाला आठवण करुन दिली की,शिवाजीने आपले मामा शाहिस्तेखान यांची बोटे कापली.मामुजानच्या मुला फत्तेखानास ठार केले होते.माझी सुरत याच शिवाजीने लुटली आहे.बादशहाच्या तख्ताचा अपमान वाढदिवसादिवशीच केला आहे.त्या शिवाजीला शिक्षा करा भाईजान शिक्षा करा.औरंगजेब बादशहा म्हणाला,शिवाजीला शिक्षा जरुर होईल पहिल्यांदा आरोप लादला जाईल नंतर शिक्षा केली जाईल.बादशहाला भर दरबारात पाठ दाखवून चालणे,खिल्लत ला ठोकर मारणे,सुरत लुटणे,मक्केपासुन मदिनेपर्यंत शिवाजीने माझी इज्जत घालवली आहे. आग्रा शहरात शिवाजीच्याच नावाची चर्चा सुरु आहे.शिक्षा होणार,जरुर होणार.शिवाजीराजे पर दरबारात जात नाहीत.दरबाराचे बोलावणे येऊनही ते जात नाहीत.आपण आजारी आहोत आमच्या वतीने शंभूराजे येतील असा निरोप पाठवतात.शिवरायांबद्दल औरंगजेबाचे सरदार वेगवेगळे सल्ले द्यायचे.
वजीर सांगायचा शिवाजी भोसले को काबुल कंदहार पर भेज दो पठाण का बंड मोडने के लिए । औरंगजेबाची बहिण जहांआरा बेगम मात्र सांगायची शिवाजी का कत्ल कर दो । औरंगजेबाने आदेश दिला होता.सिवा को नजरकैद मे रखो जो हाल दारा शुकोह का हुआ वही हाल उसका होगा ।जुम्मे के दिन सिवा का कत्ल होना चाहिए । रामसिंगाला या कटाची चाहूल लागते.रामसिंग औरंगजेबाला भेटतात आणि सांगतात.पिताजी मिर्झाराजेंनी शिवरायांना वचन दिले आहे.राजपूत जगतो शब्दांसाठी मरतो शब्दांसाठी शिवरायांना ठार मारण्याअगोदर आम्हाला ठार करावे.औरंगजेब बादशाह विचार करु लागला.शिवाजीला ठार केले तर सर्व राजपूत बगावत करतील.इराणचा शाह दिल्लीवर चालून येत आहे.वातावरण शांततेचे हवे आहे.रामसिंगला जामीन घेतले जाते आणि रणांदाजखानाच्या कोठडीत शिवरायांना ठेवले जाते.चार पाच हजार हशमांचा पहारा राजांभोवती ठेवला जातो.औरंगजेबाला मिर्झाराजेंचे पञ येते.शिवाजी मारण्याऐवजी शिवाजीला दख्खनला पाठविणे कारण शिवाजीच्या गैरहजेरीत प्रत्येक सरदार शिवरायच असतो.रामसिंगला मिर्झाराजे पञ पाठवून सांगतात.शिवरायांच्या प्राणांची जबाबदारी तुमच्यावर आहे.ती जबाबदारी तुम्ही पार पाडणे.शिवाजीराजे औरंगजेबाकडे अर्ज करतात.माझ्या सैनिकांना दक्षिणेत पाठविण्याची परवानगी देणे.सैनिकांना दक्षिणेत जाण्याची परवानगी दिली जाते.काही दिवसानंतर मिर्झाराजांचे रामसिंगाना पत्र येते.शिवरायांची तुम्ही घेतलेली जमानत रद्द करुन युध्दावर जाण्याची बादशहाला विनंती करा.रामसिंगाची जमानत रद्द केली जाते.शिवराय आजारी पडण्याचे नाटक करतात.दर्गा,मंदिर,मस्जिद येथे मिठाई वाटण्याची परवानगी मागतात.परवानगी दिली जाते.संभाजीराजे दररोज दरबारात जात होते.आग्र्याला फिरत होते.राजे दररोज झोपताना हातात सोन्याचे कडे घातलेले हात शालीच्या बाहेर ठेवूनच झोपायचे. पहाऱ्याचे सैनिक वारंवार येऊन पहायचे.राजे झोपलेले दिसायचे.आग्र्याला बाहेर काळोजी कुंभार राहत होते कुंभारवाड्यात अगोदरचं जाऊन थांबले होते.हिरोजी फर्जदच्या वेशात पेटार्याबरोबर चालत चालत आग्र्यातून बाहेर पडले.(काही चित्रपटात बाळराजे संभाजी पेटाऱ्यात बसून सुटल्याचे दाखवतात.परंतु कैद फक्त शिवरायांनाच होती.संभाजीराजे मनसबदार होते.त्यामुळे ते दररोज दरबारात जात होते.आग्र्यालाही फिरत होते.शिवाय राजे हिरोजी फर्जद यांच्या वेशात यापूर्वी अनेकवेळा आग्र्यात फिरुन आले होते) राजे पेटाऱ्यात बसून लपून छपून आतमध्ये बसून सुटले नाहीत.तर सहजपणे हिरोजी फर्जदच्या वेशात सुटले.मदारी मेहतर हिरोजी फर्जदचे पाय चेपीत बसला होता.
बहिर्जी नाईक आणि गुप्तहेर फकीरांच्या वेशात बाहेर वाट पाहत थांबले होते.काळोजी कुभाराच्या कुंभारवाड्यात सर्वजण भेटतात.राजे काळोजी कुंभारांना सुवर्ण मोहरा देतात.पती-पत्नी राजांना भाजी भाकरी देतात.कृष्णाजीपंतांना धन संपत्ती देतात.बाळ संभाजी तुमचे भाचे म्हणून राहतील.स्वराज्याचे धन संभाळा म्हणून सांगतात.राजे संन्यासाचा वेश घेतात आणि घोड्यावर बसून बाहेर पडतात.इकडे आग्रा येथे शिवरायांचा ताप वाढला आहे.औषध आणण्यासाठी वैद्याकडे चाललो आहे असे सांगून हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतरी निसटतात.फौलादखान कत्ल करण्यासाठी जुम्मे के दिन राजांना नेण्यासाठी आलेला असतो.पण शिवराय कैदेतून निसटल्याचे त्यांच्या लक्ष्यात येते.औरंगजेब बादशहाला ज्यावेळी समजते शिवराय कैदेतून निसटले.त्यावेळी औरंगजेब स्वत:चेही पहारे कडक करण्याचा आदेश देतो.आफझलखानास ठार करणारे शाहिस्तेखान मामांची बोटे छाटणारे शिवराय आपल्यावरही आग्र्यात हल्ला करण्याची शक्यता आहे असे समजून तो भितीने पहारे कडक करतो.औरंगजेब शिवरायांचा राग नेताजी पालकरवर काढतो.नेताजी पालकरांना पकडून आणून त्यांना मुसलमान करतो.त्याचे नावे कुलीखान ठेवतो.औरंगजेब उदयनराज मुन्शी जो पुर्वी राजपूत होता.पण नंतर इस्लामधर्म स्विकारलेला असतो.त्या उदयराज मुन्शीकडून औरंगजेब मिर्झाराजे जयसिंगांना विषप्रयोग करुन ठार करतो.शिवरायांचे राहिलेले सामान फकीरांना दान करण्याची आज्ञा करतो.औरंगजेब बादशहाचे हेर संभाजीच्या मृत्यूची बातमी देतात.औरंगजेबाच्या मोगली सेनेची शोध मोहीम थांबली जाते.काही दिवसात बाळराजे संभाजी स्वराज्यात सुखरुप आले.
शिवरायांनी आपल्या जीवनात जी माणसे जोडली होती.त्या माणसांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता राजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.आग्रा येथील कुंभारवाड्यातील काळोजी कुंभार,हिरोजी फर्जंद मदारी मेहतर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे यामध्ये फार मोठे योगदान आहे.शिवरायांनी सर्व माणसे पुढे पाठवली अगोदर आपल्या माणसांची काळजी घेतली.मग त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली.राजे नेहमी सहकाऱ्यांची काळजी घेत होते म्हणून राजे सहकाऱ्यांच्या, मावळ्यांच्या काळजात होते. राजांनी एकही उंट,हत्ती,घोडा मागे ठेवला नाही. ते एकटेच गेले नाहीत त्यांच्याबरोबर आलेले प्राणीसुध्दा घेऊन गेले. याच घटनेमुळे औरंगजेबाचा तिळपापड झाला.आपण, आपली सेना किती सामान्य ठरलो,आपण मुर्ख ठरलो म्हणून तो स्वत:वरच जाम वैतागला. राजांची मात्र सर्व हिंदुस्थानात चर्चा होती.
– योगेश शुक्ल 



