महाराष्ट्र

लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट २०२६ महिन्याचे १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात

 

मुंबई-राज्यातील लाडक्या बहिण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट २०२६ महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.राज्य सरकारकडून ऑगस्ट २०२६ महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत.सप्टेंबर २०२६ महिना संपत आला
तरी ऑगस्ट २०२६ महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला नव्हता.गणेशोत्सवात
तसेच गौरी गणपतीच्या वेळी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील,असे सांगितले जात होते;परंतु तांत्रिक कारणांमुळे हप्ता वितरणास उशीर झाला.अखेर २४ सप्टेंबर २०२६, गुरुवारी राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी शासन निर्णय(जी.आर.) (G.R.) जारी करण्यात आला.त्यानंतर ऑगस्ट २०२६ महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पैसे खात्यात वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.सरकारने लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट २०२६ महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने
च्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे ३३९ कोटींचा निधी हस्तांतरित (वर्ग) करण्यात आला आहे.त्यानंतर डी.बी.टी. (D.B.T.) द्वारे खात्यावर पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात पुढील २ ते ३ दिवसांत पैसे जमा होतील.पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली
असून टप्प्याटप्प्याने सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ऑगस्ट २०२६ महिन्याची १५०० रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात
(D.B.T. द्वारे) ट्रान्सफर होत आहे.पुढील काही तासांतच बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश
(एस.एम.एस.) (S.M.S.) महिलांच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button