युनिक पब्लिक स्कूल मधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा !

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजीम नरसीकर )
नांदेड हैद्राबाद राज्य महामार्गावर स्थापीत ” युनिक पब्लिक स्कूल, नरसी ” (ता.नायगांव ) येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहपुर्ण देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे यांना निमंत्रीत करण्यात आले होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले , तसेच शाळेचे अध्यक्ष प्रकाश पाटील भिलवंडे , मुख्याध्यापिका शेख तबसूम मॅडम , नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफरभाई , माजी उपाध्यक्ष गोविंद नरसीकर , सय्यद अजिमभाई यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरणात विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला एकापेक्षा एक सरस डान्स करीत असतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तिरंग्याविषयीचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना दाखवत होता . यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान तसेच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, एकता, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना जागृत करणारा ठरला कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी मोलाचे परीश्रम घेतले .



