शैक्षणिक
नागनळळी आश्रमशाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील आश्रमशाळा, नागनळळी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम, देशभक्तीपर वातावरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. जावेद पटेल होते. यावेळी सेवानिवृत्त मेजर नुरअहमद शेख, साहेबराव लवटे, उद्योगपती सचिन किरणळळी, पत्रकार रमेश भंडारी, शिवलाल राठोड, स्वामीराव गायकवाड, राजीव जगताप, नंदकुमार जगदाळे, सैदप्पा इंगळे, अशपाक मुल्ला ,दाता बलोरगी, हुसेनी सुतार, तसेच प्राचार्य मुजावर आय. एम. आणि मुख्याध्यापक शेख आर. जी. यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभुलिंग बशेट्टी यांनी केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संगीत शिक्षक रुद्राक्ष वैरागकर व प्रकाश सोनटक्के यांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प सूत्रसंचालन मनोज जगताप यांनी केले, तर मल्लिनाथ चिंचोली यांनी उपस्थितांचे आभार मानले.




