सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील गोगाव चे माजी सरपंच  प्रदीप  जगताप यांचे निधन

अक्कलकोट (- प्रतिनिधी )
 अक्कलकोट तालुक्यातील गोगाव चे माजी सरपंच भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप अंकुश जगताप ( वय ५५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दहा वर्ष गोगाव च्या सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. माजी मंत्री- विजयसिंह मोहिते पाटील आणि परिवाराचे  समर्थक म्हणून त्यांचा परिचय होता. सरपंच पदाच्या काळात त्यांनी अनेक लोकाभिमुख प्रकल्प हाती घेतले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख होती. गोगाव येथे त्यांचा अत्यविधी झाला. 
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळ कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button