धार्मिक

भगवान बुद्ध विचाराचें जीवनांत महत्त्व

 

मानसचित्तातून मुक्त होऊन हे माझे पुत्र हे माझे धन असे करीत स्वतःला जाळ्याप्रमाणे मनुष्य स्वतःला मायाजाळात आडकवितो. हा मोहपाश दूर करून जगावे.

तथागत बुद्ध सांगतात, मनुष्याने सतत स्मृतीमान आणि संप्रजन्यसहित विचरण करावे. जागरूक, विचारपूर्वक, उत्साहवर्धक राहून कार्यरत असल्याने जीवनमार्ग सुकर ठरेल. कारण आपण जे काही कृत्य करतो त्याची तयारी प्रथम मनांत विचार वितर्काने होते. नंतर कार्याच्या माध्यमातून आपण विचारांचा परिणाम भोगतो. ते परिणाम विचारावर आधारलेले असल्याने आपल्या विचारामध्ये कुशलता आणणे विचारपूर्वक बोलणे-चालणे व वागणे असावे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- विचारहित मानव वाईट अवस्थेतला पोहचतो, मनुष्याने स्वतःचे चित्त सुरक्षित करून पाटाचे पाणी वळविणाऱ्या माळ्याप्रमाणे आपले मन वळणावर लावावे. उच्च विचाराने जीवनस्तर उंचावतो परंतु जीवन स्तराचे मापन आचरणाने उच्च ठरते. तंत्र हेच सुखी जीवनाचे मूल तंत्र होय.

तथागत सांगतात, जीवनात कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. समाज जीवनाचे दोन अंतिम टोक आहेत. अतिप्रमाद आणि अतिक्लेश या दोघांचाही त्याग करून मध्यम प्रतिपदेचा अवलंब करावे. हाच आर्य अष्टांगिक मार्ग होय. या मार्गाने मनुष्य जीवन सफल होईल. आठ गुणधर्म असलेला हा अष्टांग मार्ग बुद्धाने डोळस, चक्षुमान, बुद्धिवान होऊन जगण्यासाठी शांततेसाठी संबोधिसाठी आणि निर्वाणासाठी दिलेला आहे. हा विचार गंभीर आहे. अष्टागिंक मार्गाचे ततोतंत पालन करणे अतिशय कठिण आहे. मात्र वर्तमान अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्या निर्मूलनाचे सूत्र त्यामध्ये असल्याने बौद्धांचा हा जीवनमार्ग सामाजिक कल्याणाचा आणि राष्ट्र हिताचा ठरू शकतो. पुढे तथागत बुद्धाने ‘सम्यक विहार ही जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे सांगीतले. मैत्री करूणा उपेक्षा आणि मुदिता या तत्त्वांनी युक्त्तमानवी चित्त बंधुभाव, न्याय, समता प्रस्थापित करण्याचे समाजाचे आधारस्तंभ आहेत. मैत्रीभावपूर्ण करूणामय श्रद्धेने कधीही इतर प्राण्यांचे शोषण चिंतणार नाही. असे मैत्रीपूर्ण जीवन म्हणजे सर्व सामान्य मानवाच्या कल्याणाचे धोरण होय. हा श्रेष्ठ सम्यक मार्ग, सुयोग्य असे हे पथप्रदर्शन आहे.

कुटुंबसंस्था हा भारत देशाचा कणा आहे. देशातील संस्कृती अबाधित राखण्याचे कार्य भारतामध्ये कुटुंबसंस्थेने केलेले आहे. महिला, स्त्री ही या कुटुंबाची एक मानद सदस्य आहे. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रीला घटनेने जरी समानतेचे स्थान दिलेले असले, तरी तत्वतः स्त्रीचे कुटुंबातील स्थान अजूनही दुय्यम स्वरूपाचेच आहे. कुटुंबाचा गाडा स्त्री व पुरूष रूपी दोन चाके असलेल्या गाडीने चालणार असेल तर महिलेचा समानतेच्या, बंधुभावाच्या तत्त्वावर विचार करायला हवा. हा विचार भारतभूमीच्या ललाटावर पदस्थ झालेल्या तथागत गौतम बुद्धानेच प्रथमतः आम्हाला दिला आहे. परंतु आम्ही अजूनही अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर पडून प्रकाशाच्या वाटेला लागलो असे म्हणणे म्हणजे अज्ञानच ठरले.

बौद्ध कोण असतो ?

वास्तविक निसर्गामधून मानव प्राण्यांचा जन्म हा आई-वडिलांच्या मार्फत झालेला आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष रूपी या मानव प्राण्याचा जो विकास घडत घडत इथपर्यंत प्रवास पोहचलेला आहे तो बुद्धीच्या जोरावर. प्रकृतितील इतर जीवांमध्ये बुद्धीचा चित्ताचा, मनाचा अभाव आढळतो. वैज्ञानिक दृष्ट्या विकसनशील प्राण्यांमध्ये मानवप्राणी हा बुद्धीजीवी प्राणी आहे. अर्थात प्रत्येक मानव जन्मतः उत्पत्तीमयच बौद्ध आहे. जेवढे सत्य आहे तेवढेच असत्य, अज्ञान मानवामध्ये बुद्धीवर आवरणे भरले गेल्याने पडलेले आहे. ते म्हणजे जन्मल्यानंतर तो मानवप्राणी ज्या माता पित्याकडून उत्पन्न होतो, त्याची जात व धर्म त्याला लाभणे हे होय. वैदिक संस्कृतीच्या बुद्धीविहिन विचारांनी मानवाला देव व दैत्याच्या भितीपोटी जात व धर्माच्या जोखडात बांधून त्यांची बुद्धी खिळखिळी करून टाकली होती. गौतम महामुनी महासूर्य या भूतलावर प्रखर ज्ञानज्योत घेऊन आले आणि बुद्धीला चालना दिली गेली. भगवान बुद्धाच्या या विचाराने प्रेरित झालेल्या, ज्ञानाच्या विचारांचा स्वीकार करणाऱ्या प्राण्यालाच पुढे बौद्ध ही संज्ञा देऊन ओळखले जाऊ लागले. महिला ही पुरूषांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालणारी मेणाची बाहुली असल्याने तिनेही असेच मान्य केले. वस्तुतः महिला निसर्गदत्त बौद्धिक संपत्तीने परिपूर्ण असल्याने ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती बुद्धीजीवी असल्याने जन्मतःच प्रत्येक स्त्री ही ‘बौद्ध’ आहे. असे जाणून घेणे, सध्याच्या बुद्धीजीवी स्त्रीने अज्ञान दूर करून जाणीव करून घेण्याची गरज आहे. त्याबरोबरच ज्यांनी ज्यांनी रितसर भगवान बुद्धाच्या विचारांचा अवलंब केलेला असेल ते बौद्ध आहेतच. तेव्हा “आपण बौद्ध आहोत” ही जाणीव प्रथमतः महिलांच्या मनात जागृत व्हावी. त्यानंतर आपण बौद्ध पद्धतीचाच स्वीकार करायला पाहिज. बौद्ध तत्वानुसारच जीवन आचरण करायला पाहिजे हे स्वीकारणे शक्य आहे.

पंचशीलाचे पालन

प्रत्येक व्यक्तीला सदाचारी बनण्याकरिता आपले आचरण शुद्ध ठेवावे लागते. हे शुद्ध आचरण म्हणजे बौद्ध तत्वज्ञानानुसार ‘पंचशील’ होय. यानुसार शीलाचे पालन करून आपण स्वतःचा व इतराचाही फायदाच साधणार असतो. आता हे पंचशील गौतम बुद्धाने सांगीतल्यामुळे ‘बौद्धांनी’च अनुसरायचे असेही नाही तर प्रत्येक जीव…

मुक्तीदाता विशेषांकातून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button