सामाजिक

अक्कलकोटमध्ये भव्य बाईक रॅलीने ‘सेवा संकल्प अभियाना’चा जोशपूर्ण प्रारंभ

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी प्रवासानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून ‘विकसित भारत–२०४७’ या संकल्पाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अक्कलकोट शहरात भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. 
राष्ट्रसेवा, जनसहभाग आणि विकासाचा संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अक्कलकोटच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीतून ‘सेवा परमो धर्मः’ या विचाराचा जागर करण्यात आला. तसेच विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , पंचायत समिती सभापती सौ. रश्मी हिपरगी,पंचायत समिती_उपसभापती सागर कल्याणशेट्टी, तहसीलदार  विनायक मगर, गट विकास अधिकारी  शंकर कवितेके , मुख्याधिकारी  रमाकांत डाके, मध्य मंडल अध्यक्ष . प्रदीप पाटील, उत्तर मंडल अध्यक्ष . अमोल हिपरगे, दक्षिण मंडल अध्यक्ष . महादेव पाटील, उपनगराध्यक्ष  ऋतुराज राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि अक्कलकोटचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button