सामाजिक

अक्कलकोट येथे गुरुवर्य एस.बी. इचगे सर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त १५१ स्कूल बॅगचे वाटप व विविध सामाजिक उपक्रम

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) गुरुवर्य एस.बी. इचगे सर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्कलकोट शहरातील  आझाद गल्ली येथे एस.बी. इचगे सर प्रतिष्ठान व आझाद हिंद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत १५१ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप, वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक  एस.टी. पाटील , श्री मृगेंद्र महास्वामीजी,  बसवराज इचगे ,  अमोल पाटील  उपस्थित होते.

याप्रसंगी  एस.टी. पाटील  यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. “मोबाईल व टीव्ही यांचा अतिवापर टाळावा, शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे भविष्य घडवावे” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी धडपडणारे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांनी आपले आयुष्य शिक्षण सेवेसाठी वाहिले, त्या गुरुवर्य एस.बी. इचगे सर यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे संचालक श्री प्रफुल्ल इचगे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने समर्पण, सेवा, समृद्धी या त्रिसूत्रीचा अवलंब करून भविष्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशरण इचगे, गुरू माळी, सिद्धाराम लालशेरी, मल्लिनाथ येरगुंटे, महांतेश आडवीतोटे, सुरेश नंदिकोले, सुभाष सुरवसे सर, स्वामीनाथ आलदी, सुभाष पेटकर, विजय कोले, अरुण शिंदे, बाबुराव बोदले, स्वप्निल स्वामी, मल्लिनाथ बामणगी, सूरज इचगे, तन्मय इचगे, शरणप्पा काढरामे, स्वामी बकरे, रविकांत बंकापुरे, स्वामीनाथ कोले, कल्लप्पा लिंबितोटे, समर्थ महामुनी, महादेव आडवीतोटे, बसवराज हत्तरके, गुंडू चव्हाण, सुधीर पाटील, शशिकांत इचगे, लक्ष्मीकांत इचगे, शुभम इचगे, लक्ष्मीकांत चव्हाण, इरेश फताटे, समर्थ स्वामी, शशी माळी आणि आरोग्य सेवक डॉक्टर  माशाळकर, शिरसागर सिस्टर व सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button