सामाजिक

लाडके भाऊजी  आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला कार्यक्रम संपन्न 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, गेल्या २७ वर्षापासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य घडत आहे, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून भारावलो अशी प्रतिक्रीया ख्यातनाम अभिनेते आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला” कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामाने  करण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जि. प. सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी, गिरीजाताई राजीमवाले, भगिनी समाज अध्यक्ष- विशाला अभय दिवाणजी सोलापूर, मल्लमाताई पसारे, डॉ.आसावरीताई पेडगावकर, डॉ.सौ.वेळापूरकर, डॉ. मेंथे, सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर, पूजा बांदेकर, नगरसेविका – अपर्णाताई किशोर सिद्धे, स्नेहाताई संतोष खवळे, सुनंदाताई श्रीशैल स्वामी, श्रीमती कस्तुराबाई चौगुले, अमृताताई खंडेराया शिंदे, भागुबाई नागराज कुंभार, सोनालीताई विक्रम शिंदे, रेणुकाताई शैलेश राठोड, अंजलीताई नानद सोलापूर, डॉ.सायलीताई बंदीछोडे, शांती हॉस्पिटल, वीरशैव महिला मंडळ अध्यक्षा – लक्ष्मी शरणप्पा अचलेर, वैशाली राजेंद्र लिंबीतोटे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा-  अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था सचिव- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ क्रियाशील सदस्य- सरोजिनीताई मोरे काकू, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त- अनिताताई अभय खोबरे, दिव्या मोरे, हिरकणी महिला बहुउद्धेशीय संस्था उपाध्यक्षा- रत्नमालाताई अरुण मचाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २५० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले. दरम्यान पुणे येथील ज्ञान प्रबोधनकार या अपंग व अंध संस्थेच्या कलाकारांनी भजनाचा कार्यक्रम उत्तम रित्या सादर केले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने  महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला संपन्न झाला. शेकडो माता-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
यावेळी स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, धनश्री पाटील, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, राजेराय मठाचे अध्यक्ष अॅड. शरदराव फुटाणे-जाधव, संदीपदाजी फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, समर्थ संदीप फुगे, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, रमेश केत,  मल्लिनाथ स्वामी, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे,  संजय गोंडाळ, केदार तोडकर, प्रशांत साठे,  यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button