सामाजिक

तोळणूर – उडगी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर ते उडगी रस्त्याच्या नूतनीकरणाचे  काम सुरू आहे. तोळणूर ते उडगी  रस्त्यावर मुरूम टाकून काम सुरू करण्यात आले असून आता या रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. तोळणूर ते उडगी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे तोळणूर – उडगी रस्त्याचे काम सुरू आहे. तोळणूर ते उडगी पासून अक्कलकोट हे अंतर १६ किमी होते. हा मार्ग तोळणूर येथील नागरिकांना ,वाहनधारकांना जवळचा आहे .अनेक नागरिक व शेतकरी हे अक्कलकोट शहरास जाण्यासाठी याच मार्गाचा वापर सर्रासपणे करत आहेत.सध्या या रस्त्याचे काम सुरू असून लवकर डांबरीकरण झाले तर त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. वाहनधारकांना हा रस्ता सोयीचा ठरणार आहे. तोळणुर ते उडगी रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तोळणूर येथील लोकनेते स्वर्गीय वहीदपाशा पाटील पिरजादे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिरपाशा पिरजादे सदस्य सिद्धाराम गंगोंडा शिवानंद बिराजदार सुभाष रब्बा लक्ष्मण व्हनप्पा कोळी गुरप्पा दरगोंडा नबीलाल गुगी कुरनूर पठाण आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button