सामाजिक

ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री गणेश स्तवन..!, तारकमंत्र, निशंक हो.. निर्भय हो..!, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..! विठ्ठल..! विठ्ठल…!!, अशा एक ना अनेक मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ या सदाबहार गाण्याने श्रोते भारावून गेले होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, बुधवार सायंकाळी ७.१५ वा. ‘स्वर आर्या’ सादरकर्ते – आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई ह्या कार्यक्रमाने चौथे पुष्प संपन्न झाले. 
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संपादक- महेश रामदासी, माजी नगरसेवक- विजुभाऊ तांडेल मुंबई,  संपादक- प्रशांत माने, सुनील घाटे, मुंबई, संपतराव शिंदे, नगरसेवक महेश हिंडोळे, सद्धाम शेरीकर, पंचायत समिती सदस्य- विनोद मोरे, अपाशा किवडे, प्रथमेश इंगळे, आराध्य तांडेल, रिजनल हेड, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया- अंचित कुमार, बीड युवा सेना प्रमुख ऋषिकेश लोमटे, यश कल्याणी सेवाभावी संस्था अध्यक्ष- गणेश केरे पाटील, पुणे, इंग्लिश असोशियन चे अध्यक्ष- बाळकृष्ण लावंड, गुरुनाथ बुचांडे, पक्षी मित्र कल्याणराव साळुंके करमाळा यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज  व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांचे चिरंजीव कु. स्वराज याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यावर मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – आर्या आंबेकर यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. 
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे,, उज्वला भोसले, छाया पवार, रुपा पवार व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, मनोज निकम, प्रा.शरणप्पा आचलेर, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. भीमराव साठे, प्रवीण देशमुख, अरविंद शिंदे, अतिश पवार, प्रवीण घाटगे, गोटू माने, संजय गोंडाळ, सौरभ मोरे, वैभव मोरे, रोहित खोबरे, कांत झिपरे, मारुतीराव बोरकर, सर्फराज शेख, किरण पाटील, रोहित पाटील, निखील पाटील, नारायण गडदे, मैनुद्दीन कोरबू, बलभीम पवार, शुभम सावंत, मल्लिकार्जुन गवळी, मुन्ना महाडिक, रमेश शिंदे, विजय इंगळे, अप्पा गवळी, सागर गोंडाळ, सादिक बागवान, मुन्ना माळवदकर, आकाश गडकरी, अमर मासरे, वासू कडबगांवकर, गोविंदराव शिंदे, बाळासाहेब घाटगे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button