सामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यात महा रक्तदान शिबिर; १०८७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अक्कलकोट 🙁 प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्ष, अक्कलकोट विधानसभा यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले महा रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत अक्कलकोट शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये एकूण १,०८७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
सदरील महा रक्तदान शिबिर अक्कलकोट शहरासह मुस्ती, कुंभारी , वळसंग, पानमंगरूळ, जेऊर, नागणसूर, वागदरी, सलगर, मैंदर्गी व दुधनी आदी भागात झालेल्या महारक्तदान शिबिरात १०८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
या महा रक्तदान अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दमानी ब्लड बँक तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलनाचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे रक्तदान शिबिर यशस्वी ठरले.
भाजपा कार्यालय, अक्कलकोट येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून युवकांसह विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.
याच प्रसंगी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, मध्य मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष ऋतुराज (बंटी) राठोड, शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, प्रवीण शहा, तम्मामामा शेळके, अंकुश चौगुले, अपर्णा सिद्धे, महेश इंगळे, अशोक जाधव, कांतू धनशेट्टी, अविनाश मडीखांबे, सदाम शेरीकर,अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील, सुनील सिद्धे, शिवराज स्वामी, नन्नू कोरबू, सचिन स्वामी, रजाक सय्यद, महावीर शेडजी, शिवशरण जोजन, राजशेखर हिप्परगी, प्रशांत लोकापुरे, मुन्ना राठोड, ऋषिकेश लोणारी, सचिन शिंदे, रशीद खिस्तके व लालसिंग राठोड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button