राजकीय

दुधनी येथे लवकरच ‘एमआयडीसी’ (औद्योगिक वसाहत) मंजूर करू – उद्योगमंत्री उदय सामंत 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट परिसराच्या विकासात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्मितीत म्हेत्रे परिवाराचे मोठे योगदान आहे. ज्यांनी बाजार समिती उभी केली, त्यांचा आदर राखलाच पाहिजे. शिवसेना आणि महायुती सरकार   सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून,  त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही.तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी दुधनी येथे लवकरच ‘एमआयडीसी’ (औद्योगिक वसाहत) मंजूर करण्यात येईल,” अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत  अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली 
       या प्रसंगी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, शिवसेनेचे सोलापूर महापालिका नगरसेवक अमोलबापु शिंदे, अमर पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्य शितल म्हेत्रे, भिमण्णा सोलापूरे, संगीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, नगरसेवक बसवराज हौदे, पंचायत समिती सदस्य मोरे, सरपंच व्यंकट मोरे, रविनाताई राठोड, रईस टिनवाला यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उदय सावंत म्हणाले की या तालुक्यात  शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर ते आपण खपवून धेणार नाही.
दुधनी बाजार समिती मधे स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा पुतळा बसवण्यासाठी कायदेशीर काय प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी पुन्हा आपण पुतळा उभा करू आपण पुतळा तयार ठेवा मी स्वतः येऊन  पुतळा उभा करेन असेही यावेळी ते म्हणाले.ज्या ठिकाणी स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा पुतळा तयार करण्यात आलेला चबुतरा पाडून त्याच ठिकाणी गणेश मंदिर बांधकाम केले आहेत. गणेश जी हे विघ्नहर्ता देव असून बहुतेक सिद्धाराम म्हेत्रे व म्हेत्रे परिवारावरील सर्व विघ्न दूर करण्यासाठी ते आपले असे मला वाटते.
या तालुक्यात काय चालु आहे ते आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना सांगुन त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना सागु असेही यावेळी म्हणाले 
तालुक्यातील युवकांच्या हताला काम देऊन त्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण दुधनीला औद्योगिक वसाहत उभा करण्यासाठी सर्व ती मदत करुन युवकाला स्वावलंबी करु असे ते म्हणाले.
​       या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्थानिक प्रशासन आणि राजकीय विरोधकांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “सध्या अक्कलकोट तालुक्यात नेमके काय चालले आहे? आम्ही सत्तेत आहोत की विरोधात, हेच समजेनासे झाले आहे. अधिकारी वर्गावर दबाव आणून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून चबुतरा पाडण्यात आला आणि तिथे धार्मिक स्थळ उभारण्यात आले. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग मनात धरूनच हा चबुतरा पाडण्यात आला आहे,” असा थेट आरोप म्हेत्रे यांनी केला.
​      खासदार धैर्यशील माने यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत विरोधकांचा समाचार घेतला.  म्हेत्रे यांनी जनतेसाठी केलेले काम आणि त्यांचा विचार आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. ज्या ठिकाणी चबुतरा पाडण्यात आला, त्याच ठिकाणी तो पुन्हा अभिमानाने उभा राहील. शिवसेना अन्याय करणाऱ्यांविरोधात म्हेत्रे यांच्या पाठीशी ढाल म्हणून उभी आहे,” असे खासदार माने यांनी स्पष्ट केले.
चौकट १) 
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे हात बळकट करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पक्षातील दोनशेहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला.पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिले जाईल असे सिध्दाराम म्हेत्रे  यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button