Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

तुकाराम मुंढे यांचा धडाका !३७हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं,अजिंक्यराणा’ केंद्रावर कारवाई

Admin by Admin
July 12, 2026
in सोलापूर
0
तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : -अन्न व औषध प्रशासन (एफ.डी.ए.) (F.D.A.) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

याच तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ‘इफेक्ट’
आता सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे.

सांगोला तालुक्यातील जवळा येथील एका दूध संकलन केंद्रावर एफ.डी.ए.(F.D.A.)ने छापा टाकून तब्बल ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केलं.या दुधाची किंमत जवळपास १५ लाख इतकी आहे.एफ.डी.ए.(F.D.A.)च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात झालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे.

या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायात भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’वर छापा -सांगोला तालुक्यातील जवळा येथे अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज नावाचं एक मोठं दूध संकलन केंद्र आहे.

या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे एफ.डी.ए.(F.D.A.)च्या पथकाने या केंद्रावर अचानक छापा टाकला.या छाप्यात तब्बल १५ लाख रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला.दुधाचा हा अवाढव्य साठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं समोर आल्याने अधिकाऱ्यांनी कोणताही वेळ न घालवता हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट केला.

दूध केंद्र तातडीने बंद करण्याचे निर्देश –

एफ.डी.ए.(F.D.A.)च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दुधाचे एकूण चार वेगवेगळे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हे
अजिंक्यराणा दूध संकलन केंद्र
तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

दुग्धजन्य पदार्थांमध्ये किंवा दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ सहन केली जाणार नाही
आणि यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा एफ.डी.ए.(F.D.A.) प्रशासनाने दिला आहे.तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने राज्यभरातील भेसळखोरांचे धाबे मात्र आता चांगलेच दणाणले आहेत.

Previous Post

रस्त्यावर दुधाचा महापूर ,धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं ,धक्कादायक प्रकार

Next Post

ज्युबिलीस्टार अभिनेते राजेंद्रकुमार

Admin

Admin

Next Post
ज्युबिलीस्टार अभिनेते  राजेंद्रकुमार

ज्युबिलीस्टार अभिनेते राजेंद्रकुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697