Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, स्वतःच्याच सीलबंद घरातुन ३ काेटी जप्त

Admin by Admin
July 12, 2026
in क्राईम
0
लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, स्वतःच्याच सीलबंद घरातुन ३ काेटी जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव –  अकोला येथे सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि मूळचे जळगावचे रहिवासी किरण चौधरी यांचा प्रताप भल्याभल्यांना घाम फोडणारा आहे. १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईनंतर चौधरी यांच्या जळगावातील घरातून जवळपास तीन कोटी रुपयांची रोकड, सोने-चांदी (Gold and Silver) आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

आधीच हे दोन प्रकरण अंगाशी आलेले असताना आता चौधरी आणखी अडचणीत आले आहे. स्वतःच्या सीलबंद घरातील पुरावे नष्ट करण्यासाठी नातेवाईकांना घरफोडीस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी किरण चौधरी (Kiran Chaudhary) यांना अकोला येथून ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली.

 

नेमकं प्रकरण काय ?

काही दिवसांपूर्वी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा किरण चौधरी यांच्याविरुद्ध दाखल झाला होता. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या जळगाव येथील घरावर छापा टाकत घर सील केले होते. मात्र, चौधरी यांच्या आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्तेचा तपास सुरू असतानाच सीलबंद घरात घुसून तेथील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी सीलबंद घरात प्रवेश करून तेथील काही साहित्य आणि कागदपत्रे हलविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा घर सील करून तेथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला.

Previous Post

अभिनेते जलाल आगा

Next Post

दुधनी येथे लवकरच ‘एमआयडीसी’ (औद्योगिक वसाहत) मंजूर करू – उद्योगमंत्री उदय सामंत 

Admin

Admin

Next Post
दुधनी येथे लवकरच ‘एमआयडीसी’ (औद्योगिक वसाहत) मंजूर करू – उद्योगमंत्री उदय सामंत 

दुधनी येथे लवकरच 'एमआयडीसी' (औद्योगिक वसाहत) मंजूर करू - उद्योगमंत्री उदय सामंत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156959
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697