महाराष्ट्र
आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या रॉयल एंन्ट्रीने विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात वेधले लक्ष !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सध्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन राजधानी मुंबई येथे सुरू झाले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूरच्या पालकमंत्र्यांसोबत रॉयल एन्ट्रीने विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले गेले. आमदार कल्याणशेट्टी यांनी समाज माध्यमावर फोटो सोडल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गुरुवारी दमदार एन्ट्री केली.त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे होते. मंत्री महोदय व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची रॉयल एन्ट्री ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी समाज माध्यमावर विधिमंडळ अधिवेशनातील प्रवेशनाचा फोटो सोडला असून या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक समर्थकांनी या फोटोला प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




