महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीमुळे महिला बचत गटांच्या कर्जफेडीचा प्रश्न गंभीर; महिलांना हप्ते भरणे कठीण 

 

राज्य सरकारने महिला बचत गटांना कर्जमाफी, व्याजमाफी व कर्जफेडीस मुदतवाढ देण्याची मागणी 

माजलगाव / बीड ( नाजेर कुरेशी )
राज्यात दुष्काळीने गोर गरीब होरपळूण  निघत आहे.
सर्व परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या महिलांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी शेंती व्यवसायावर परिणाम झाला असून शेंतमजुरी व रोजगाराच्या संधी कमी झाल्याने महिलांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे महिलांना कठीण झाले आहे.

महिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने कर्जाचे हप्ते आणि व्याज भरण्याची चिंता महिलांना सतावत आहे. घरखर्च भागवायचा की कर्जाचा हप्ता भरायचा, असा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे.

महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे या महिला पुन्हा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने महिला बचत गटांच्या कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी, व्याजमाफी द्यावी तसेच कर्जफेडीसाठी सहा ते बारा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.

तसेच बँका व वित्तीय संस्थां भारत फायनान्स , बंधन गट आय डी एफ सी बॅक कर्जवसुलीसाठी महिलांवर मानसिक दबाव आणू नये. शासनाने तातडीने जीहार द्यावा विशेष मदत योजना जाहीर करून महिला बचत गटांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.राज्यात खुप भयानक दुष्काळ पढ़ला आहे खुप आत्महत्या होत आहे, प्रशासनाने नियोजन करावा ,दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या महिलांना प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा महिला बचत गटांच्या अडचणी अधिक गंभीर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button