क्राईम
मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) मैंदर्गी येथून दुधनीकडे कामानिमित्त मोटार सायकलवरून जाणाऱ्या युवकानां कारने ठोकारल्याने दोन युवकाचां मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की , दिंनाक १७ जून रोजी रात्री ८ वा. चे सुमारास मैंदर्गी ते दुधनी जाणारे रोडवरील गणेश मंदीर जवळील भुती यांचे शेताजवळील रोडवर मंजुनाथ शिवानद मसुती व मित्र शिवराजकुमार शरणय्या गुत्तेदार हे मंजुनाथ शिवानद मसुती याच्या ताब्यातील होन्डा युनिकॉर्न कंपनीची मोटर सायकल ( MH १३ EQ ०९२७ यावरून दुधनीकडे जात असताना त्यांचे मोटर सायकलीस समोरून एक पांढरे रंगाची ह्युदाई कंपनीची क्रेटा कार ( MH १३ EK ९७०९ यावरील चालक भिमराया शरणप्पा बहिरगोंडे ( रा. रोहीणी नगर, विचापुर रोड, सैफुल सोलापुर ) याने त्याच्या ताब्यातील सदर कार हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने चालवुन मोटर सायकलीस धडक दिल्याने मोटर सायकल वरील मंजुनाथ शिवानंद मसुती (वय २३ वर्षे )व मित्र शिवराजकुमार शरणय्या गुत्तेदार (वय २८ वर्षे दोघे रा. मैंदर्गी ता. अक्कलकोट जि. सोलापुर ) यांना गंभीर जखमी करून त्यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. या अपघाता प्रकरणी दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद झाली आहे. याबाबत फिंर्याद – रमेश बसवराज मसुती ( वय ३४ वर्षे रा. मैंदर्गी ता. अक्कलकोट ) यांनी दिली आहे.
पुढील तपास एपीआय माने हे करत आहेत. मैंदर्गी येथील दोन युवकाचां अपघातामध्ये मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.



