सोलापूर

उजनी धरणावरील प्रकल्पांच्या विरोधात काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

 

राज्य शासनाच्या विरोधामध्ये घोषणा; तहसील कार्यालयाला निवेदन

करमाळा (प्रतिनिधी)केंद्र व राज्य सरकारकडून उजनी धरणावर होत असलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला असून करमाळा तहसील कार्यालयासमोर आज रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. हे प्रकल्प रद्द करून शेतकरी, मच्छीमार, रहिवासी, लघु उद्योजक, इत्यादींच्या जीवनातील संभाव्य धोका टाळावा असे आवाहन युवक काँग्रेस संगठनेचे साहेबराव वाघमारे यांनी यावेळी केले.

उजनी धरणावरील सदरच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांना साहेबराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून कडाडून विरोध करण्यात आला. येथील नायब तहसीलदार यांना यासंदर्भात एक निवेदन देण्यात आले. शासनाच्या विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. ह्या आंदोलनाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अविनाश सरडे, महिला कॉंग्रेसच्या भावना गांधी, कोमल बेग, सारिका कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, होलार समाजाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमोडे, तुकाराम घोंगडे, तालुका काँग्रेसचे सचिव जैनुद्दीन शेख, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बंडगर, हनुमंत चांदणे, शिवाजी शिंदे यांच्यासह संभाजी शिंदे, प्रशांत उघडे, सचिन उघडे, गुणवंत ठोसर, कपिल देडगे, किरण खरात, जनार्दन उबाळे, निलेश चांदणे, करण आवटे, महेश चांदणे, समीर शेख, अजय कांबळे, लौकिक वाघमारे, शौर्य कांबळे, मयूर कांबळे, आप्पा मारकड, रामा पांडव, नितीन आरणे, दादा आरणे, गोरख गायकवाड, शहाजी इकळे, मिलिंद भोसले, देवराम भोसले, दया आव्हाड, आदी शेतकरी तसेच; काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले होते.

उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी इथे आपले सर्वस्व अर्पण केलेले आहे. तरीही शासन त्यांचीच जमीन पुन्हा एकदा घेत त्यांच्यावर अन्याय करून हानिकारक प्रकल्प उभारत त्यांचे भवितव्य धोक्यात आणत आहे. हे सगळे गंभीर आहे. ह्या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प आम्ही होवू देणार नाही. – भावना गांधी [महिला काँग्रेस]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button