सामाजिक

दुधनी मार्केट कमिटीत पुतळा-मंदिर बांधकामावरुन तक्रार

सचिव-लिपीकांविरुध्द म्हेत्रे गटातील संचालकांची पोलिस ठाण्यात तक्रार
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – दुधनी मार्केट कमिटीचे संस्थापक कै. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मार्केट कमिटीच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या पुतळ्याचे काम थांबवुन त्याच ठिकाणी नवीन गणेश मंदिराचे बांधकाम सुरु करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हेत्रे गटातील संचालकांनी सचिव स्वामीनाथ स्वामी व लिपीक शिवानंद माळगे यांच्या विरोधात दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
               दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हेत्रे गटातील संचालक शिवानंद पाटील,चंद्रकांत येगदी, सातलिंग परमशेट्टी,बाबु कोळी व ईरण्णा दसाडे या सर्वांनी याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.या तक्रारीत सचिव स्वामीनाथ स्वामी व वरिष्ठ लिपीक शिवानंद माळगे यांच्यावर अनेक ठपके ठेवण्यात आले आहेत.प्रत्येक गोष्टीत राजकारण करत सचिव व लिपीकांचे काम सुरु आहे. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुतळ्याचे काम थांबून त्या ठिकाणी गणेश मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.यासाठी दोघेही व्यापारी बांधवांकडून वर्गणी गोळा करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच मंदिराच्या बांधकामासाठी संबधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना घेतला नाही, हे काम नियमबाह्य आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर याठिकाणच्या विविध धर्मातील व्यापाऱ्यांच्या भावना दुखावू शकतात.लिपिक माळगे यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुधनी मार्केट कमिटीअंतर्गत येणाऱ्या नागणसूर सबमार्केट कमिटीचे नाव बदलण्यात आले आहे.सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी मार्केट कमिटीची स्थापना करून शेतकऱ्यांना आधार दिला,त्यांचा फोटो काढण्यात आला आहे.यामध्ये स्वामी व माळगे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देण्यात आली आहे.
चौकट – दुधनी कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव स्वामिनाथन  स्वामी, व  शिवानंद माळगे वरीष्ठ लिपीक या दोघांनी बाजार समिती मधे मोठ्या प्रमाणात घोटाळा केले आहेत व व्यापारी वर्गाला त्रास देत आहेत.
 तसेच  सचिव  स्वामी याला पगार असताना ही  बेकायदेशीर बाजार आवारात एल आय सी  चे धंदा उभा केला आहे. व्यापारी वर्गाना त्रास देऊन  त्यांचेकडे येण्यासारखे करून नंतर एल आय सी पॉलिसी उतरविण्याचे काम करत आहे अशा 
 संबंधित दोन्ही दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल –  
शंकर म्हेत्रे शिवसेनेचे नेते 
      
चौकट –
 दुधनी मार्केट कमिटीतील प्रत्येक काम शासकीय नियमानुसार सुरू आहे.मी सुरुवातीपासूनच मार्केट कमिटीचे काम पाहत आलो आहे.स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात आजही तितकाच आदर आहे. प्रत्येक कामाच्या बाबतीत संचालक मंडळाने केलेल्या ठरावानुसार सर्व काही चालते. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत –
सचिव स्वामी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button