राजकीय

अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सोमवारी बैलगाडी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
येथील वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार ८ जुन रोजी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी सकाळी विकास हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सद्या देशात आणि राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले असुन गोर गरीब सामान्य जनता या दरवाढी मुळे महागाईत होरपळत आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि नीट पेपरफुटी मुळे २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असुन ते सरकारचे अपयश आहे त्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्याच्या मालाला सद्या कवडीचा भाव आहे, कांद्याला भाव नाही, खताचे किंमती प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ, तसेच राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या ७३० कोटी रुपये लाडक्या बहिणीकडे वळवून अनुसूचीत जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान केले. त्याच्या निषेधार्थ, सद्याच्या तरुणाच्या हाताला काम नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, महिला वर दिवसें दिवस अन्याय व अत्याचार वाढत आहे, तसेच दर दोन दिवसाला बलात्काराचे घटना घडत आहे. तसेच त्याच प्रमाणे राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर ठेऊन खुना सारखे गंभीर प्रकरण दर दिवसा व दिवस ढवळ्या खुनाचे प्रकरण वाढत आहेत त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हे सरकारचे अपयश असुन असे अनेक विषय घेऊन सोमवार दि. ०८.०६.२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. ए-वन चौक-कमलाराजे चौक फत्तेसिंह चौक-मेनरोड येथून सुरुवात होऊन विजयकामागार चौक व एस-टी स्टॅन्ड वर या मोर्चाचे सांगता होणार आहे.
या मोर्चेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव, राज्य उपाध्यक्ष अॅड. सरोजीत बनसोडे, सोलापूर जिल्हा निरिक्षक तथा राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे सर, राज्याचे प्रवक्ते अॅड. अरुण अण्णा जाधव आणि सोलापूर जिल्हयाचे नेते रवी गायकवाड, जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे,
बबन गायकवाड, भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष साहिल कांबळे, तालुका उपाध्यक्ष यशवंत इंगळे, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, अमृत सोनकांबळे, शहर उपाध्यक शिवाजी चौगुले, नितीन शिवशरण आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button