शांताराम गणेश खुडे यांचा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे ( अशोक शिवशरण)” बी. दी. चेंज फाउंडेशन शिर्डी.”तर्फे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष शांताराम गणेश खुडे यांचा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार
2026 ने सन्मान करण्यात आला.समाजसेवेचा प्रतिष्ठित असा सन्मान सोहळा शिर्डी येथे दिनांक 17/05/2026 मोठ्या उत्साहात पार पडला.समाजसेवा, प्रमाणिक कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठा, व उल्लेखनीय,योगदानाबद्दल शांताराम खुडे यांनी केलेल्या कामाबद्दल कामाचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार ” 2026 सन्मान प्रमाणपत्र, तसेच उल्लेखन सन्मान चिन्ह देऊन समाज परिवर्तनासाठी उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. यावेळी शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सक्रिय निष्ठावंत निर्भय कार्यकर्ते, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मित्र तसेच राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते. शांताराम खुडे यांना राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



