सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातून विनापरवाना मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढले 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातून विनापरवाना मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढले असून याबाबत नागरिकांतून व शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट तालुक्यातून होणाऱ्या मुरूम उत्खननाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.अक्कलकोट तालुक्यात विविध भागात रस्ते विकासाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे या रस्ते विकासाच्या कामासाठी सर्रासपणे शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच शासकीय जागेतील मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.छोटे छोटे डोंगर पोखरून त्यातून मुरूम उत्खनन करून ते रस्त्याच्या भरावासाठी वापरण्यात येत आहेत वास्तविक पाहता लाखो ब्रास मुरूम उत्खनन हे शासकीय परवानगीने होत आहे की विनापरवाना होत आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे या मुरूम उत्खननामुळे नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावातील छोटे छोटे डोंगर हे पूर्णपणे पोखरून मुरूम मोठ्या प्रमाणात उचलण्यात येत आहे लाखो ब्रास मुरूम हे रस्ते विकासासाठी वापरण्यात येत आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
 दि. २८ /९ / २०२० रोजी माझे शेतातील शिरवळ शेत गट नंबर -२७८/ १/अ / १/इ मधून गौणखनिज ५ लाख ब्रास विनापरवाना मुरूम उत्त्खनन करून ” मेहुल कंन्ट्रॅकशन, पद्मावती कॉम्प्लेक्स, विजापूर रोड, सोलापूर यांनी वाहतूक केलेबाबत मा. तत्कालीन तहसीलदार यांना निवेदन देऊनही आजपर्यंत चोरून मुरूम नेलेले निकाल लागले नाही.आणि सध्या अक्कलकोट भागातील चेन्नई -सुरत रोडसाठी व अक्कलकोट तालुक्यातील सर्व भागात शेतकरी यांचे मुरूम जबरदस्तीने उचलणे चालू आहे. याला जबाबदार कोण, तसेच आजपर्यंत झालेली शेतकरी यांची बेहिशोबी नुकसान भरपाई कोण देणार ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.अक्कलकोट तालुक्यातील विविध गावात जर मुरूम उत्खनन असेच होत राहिले तर नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता निसर्गप्रेमी मधून व्यक्त केली जात आहे .प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अक्कलकोट तालुक्यातून होणाऱ्या मुरूम उत्खननाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button