शैक्षणिक

सौ सुरेखा कल्याणशेट्टी सेमी विभागाचा निकाल १०० % 

अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८७.५० % इतका लागला असून यात सेमी विभागाचा १००% निकाल लागला आहे. यामुळे विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.  
     मार्च २०२६ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रशालेतून एकूण ८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल ८७.५०% इतका लागला आहे. यात ११ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून डिस्टिंक्शनमध्ये आले आहेत. तर कुमारी नम्रता सुरेश माशाळे ही ९१.६०% गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे, कु.आदिती बसवराज बानेगाव ही ८९% घेऊन दुसरी आली तर कुमारी विजयालक्ष्मी शिवप्पा हिळ्ळी ही ८८.८०% घेऊन प्रशालेत तिसरी आली आहे.
      सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, जुनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button