शैक्षणिक
अक्कलकोट तालुक्याचा दहावीचा निकाल ८१.१२

मंगरूळेचा कृष्णा सुरवसे तालुक्यात प्रथम तर शहाजीची प्रणया साळुंखे तालुक्यात द्वितीय
अक्कलकोट: ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा शुक्रवारी दहावीचा आँनलाईन निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ८१.१२ टक्के इतका लागला आहे. तालुक्यातून एकूण ४०३१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाली होती. त्यात ३२७० विद्यार्थी यशस्वी झाले. उत्तीर्ण झालेल्यात विशेष प्रावीण्यासह ४३६, प्रथमश्रेणी मध्ये ८५६, व्दित्तीय श्रेणीमध्ये ११३३ तर पास श्रेणी मध्ये फक्त ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गत वर्षी पेक्षा तालुक्याचा निकाल गेल्या वर्षी नऊ टक्याने कमी झाला. आता त्यात परत चार टक्के निकाल कमी लागला. विशेष प्रवीण्य व प्रथम श्रेणी मधील विद्यार्थी हजाराच्या पटीत कमी झाले. आज शुक्रवारी सकाळी ११.३० आँनलाईन निकाल जाहीर झाला. विद्यार्थी मोबाईलवर निकाल पाहताना दिसत होते.
तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयांचा निकाल खालील प्रमाणे आहे.
श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट ७१.८२,मंगरूळे ९७, ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगांव ७७.५५, श्री बसवराज हायस्कूल करजगी : ७४.६८, श्री शिवचलेश्वर हायस्कूल मैंदर्गी ८०.२०, एस.जी.परमशेट्टी दुधनी ८०.४०, नूतन विद्यालय पान मंगरूळ ९४.१२, श्री एस.एस.शेळके प्रशाला वागदरी ७३.२८, अँग्लो ऊर्दु ८९.०६, राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला ८५.७१, सिद्धरामेश्वर हायस्कूल तोळणूर ८१.२५, धोंडुबाई प्रशाला चुंगी ८४.२१ श्री काशिविश्वेश्वर हायस्कूल जेऊर ८७.९०, एच जी प्रचंडे हायस्कूल नागणसुर ८१.१७, श्री मल्लीकार्जुन विद्याविकास प्रशाला किणी ७०.७८, दहिटणे प्रशाला ७६.१९, जयशंकर प्रशाला तडवळ ७३.१३, पोस्ट बेसिक हायस्कूल कोन्हाळी ४६.१५,जैनबी उर्दु मैंदर्गी ८५.१८,कुरनूर ७४.५०,शिरवळ ७८.३७,
पोस्ट बेसिक आश्रम शाळा बोरोटी ९१.८३,अनंत चैतन्य हन्नुर ७६.०५, नवयुग विद्यालय बादोले ७५, उडगी प्रशाला उडगी ८५.५४, सलगर ८२.०५, आष्टे प्रशिला भुरिकवठे ९१.१७, शारदामाता ९२.८५ , श्री जे.पी.हायस्कूल गौडगांव ८३.७०, श्री कलमेश्वर प्रशाला सुलेरजवळगे ८६.२०, काशिराया काका पाटील विद्यालय अक्कलकोट ४८.२१, श्री कुमारेश्वर विद्यालय शावळ ८६.३६, सौ सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल अक्कलकोट ८७.५०, श्री स्वामी समर्थ प्रशिला आरळी शंभर टक्के , हैद्रा प्रशाला ७१.४२, भावी विद्यालय गुड्डेवाडी ९३.०२, इब्रामपुर ८९.२८, बोरगांव ८८.८८,संगोगी बसवन ९७.८२ , विद्याविजय प्रशाला ७९.४१, हत्तीकणबस ९१.८९, श्री मल्लीकार्जुन विद्यालय केगांव बु ८९.०४,बसववेश्व काझीकणबस ९३.३३, मल्लिकार्जुन बोरगांव ८१.०८, मलकप्पा पाटील प्रशाला कोर्सेगांव ७२.९७,कै. कोंडीबा इंगळे प्रशाला कर्जाळ ५३.३३, जय हनुमान विद्यामंदिर शेगाव ६२.५०, इस्लाह ब्रिगेड अँग्लो उर्दू हायस्कूल करजगी ८४.३७, म्हेत्रे प्रशाला ७९.४१, शेळके कन्या नागणसूर ८६.९५ ,
श्री तारामाता प्रशाला अक्कलकोट ५०,सांगवी प्रशाला ९४.७३, के.बी. एन.माध्यमिक आश्रम शाळा नागनहळ्ळी ५८, माध्यमिक आश्रम शाळा रुद्देवाडी ४७, माध्यमिक आश्रम शाळा हंजगी ५९.३२, श्री डुंगरनायक महाराज माध्यमिक आश्रम शाळा डिग्गेवाडी ३४.६९, श्री शावरसिद्ध लायव्वादेवी प्रशाला आळगी९२.५०,हालचिंचोळी ७०.५८,
शंभू महादेव विद्यामंदिर घोळसगांव( कन्नड शंभर, मराठी माध्यम ९४.११), जैनाब उद्दु ९४.७३, वीरभद्रेश्वर म्हैसलगी ८२.३५, मिरजगी प्रशाला ९६.६६, बणजगोळ प्रशाला ९३.३३, काळे प्रशाला सातनदुधनी ८४,मातोश्री लक्ष्मीबाई कन्नड विद्यालय सदलापूर ८७.५०,
इंडियन मॉडेल स्कूल शंभर टक्के, शासकीय निवासी शंभर टक्के, शाहु फुले आंबेडकर विद्यालय काझीकणबस ९०.९०, केशव आबाजी तडवळ शंभर, मातोश्री एन सी.खेडगी ९३.०२ व विश्वा स्कूल शिवपुरीचा शंभर टक्के लागला.
चौकट १) ७५ पैकी फक्त सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला. गेल्या वर्षी ३२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. तो फक्त सहा वर आला. शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा…
आरळे, घोळसगाव कन्नड, इंडियन माँडेल स्कूल, शासकीय निवासी शाळा, तडकळ केशव स्कूल व विश्वा स्कूल शिवपुरी
या फक्त सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
चौकट २) मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेची प्रणया साळुंखे तालुक्यात द्वितीय, प्रशालेत प्रथम
येथील मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल, अक्कलकोट चा दहावीचा निकाल ७१.८२ टक्के इतका लागला असुन प्रशालेतील प्रथम क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्प गुच्छ देऊन प्रशालेतर्फे करण्यात आला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल नुकताच लागला असुन प्रशालेतुन परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी संख्या १८१ विद्यार्थींपैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रशालेचा एकुण निकाल ७१.८२ इतका लागला. प्रशालेतुन कुमारी प्रणया लक्ष्मण साळुंखे ९७.२० टक्के घेऊन प्रशालेतुन प्रथम तर कुमारी आर्या विकास जाधव ९५ घेऊन द्वितीय तर कुमार शिंपी चिन्मय प्रशांत ९४.८० टक्के घेऊन तृतीय आली. प्रशालेतुन २२ विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मिळवलेले असुन प्रथम श्रेणीत २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणीत ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मराठा मंदिर विद्यावर्धिनी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव मनोहर साळवी, शालेय समिती सदस्य एस.एन.फडतरे, बी.व्ही.निंबाळकर, अमोलराजे भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक आर. एस. पडवळकर, पर्यवेक्षक वाय. पी .कबाडे यांनी अभिनंदन केले.
अक्कलकोट फोटो – मराठा मंदिर श्री शहाजी
प्रशालेतुल एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना मुख्याध्यापक आर . एस.पडवळकर व पालक.
चौकट ३) मंगरूळे प्रशालेचा निकाल ९७ टक्के लागला. कृष्णा प्रकाश सुरवसे याने ९७.८० टक्के मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर शांभवी अजगुंडे ९६.४० टक्के मिळवून प्रशालेत द्वितीय तर घिवारे विश्वेष अनिल याने ९४.८० टक्के मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवले. प्रशालेचे मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.






